नागपूर : राज्य शासनाने वन विभागात अक्षरश: बदली बॉम्ब टाकून एकाच दिवशी शेकडो वरिष्ठ वन अधिकार्यांचे बदली आदेश जारी केले आहेत. माहिती सूत्रानुसार यात १४ विभागीय वन अधिकारी (डीएफओ), ८ सहायक वनसंरक्षक ( एसीएफ ) व ९९ वन परिक्षेत्र अधिकार्यांचा (आरएफओ) समावेश आहे. यासंबंधी शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार वन मुख्यालयातील प्रसिद्धी व माहिती अधिकारी कमलाकर धामगे यांची नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालयात विभागीय वन अधिकारी (सर्वेक्षण व संनियंत्रण) म्हणून बदली करण्यात आली आहे. शिवाय त्यांच्या जागी ठाणे येथील वन प्रकल्प विभागातील विभागीय व्यवस्थापक बी. टी. भगत यांची पदस्थापना करण्यात आली आहे. तसेच सामाजिक वनीकरण विभागातील उपसंचालक एस. एस. पाटील यांची चंद्रपूर येथे, नंदूरबार येथील एस. डी. वाढई यांची जालना येथे, पुणे येथील ए. टी. थोरात यांची सांगली येथे, अलिबाग येथील एस. बी. केवटे यांची धुळे येथे , सातारा येथील व्ही. जे. भिसे यांची पुणे येथे, ठाणे येथील धुमाळ यांची सातारा येथे , ठाणे येथील अवैध शिकार प्रतिबंधक विभागातील व्ही. पी. पाटील यांची ठाणे येथील दक्षता विभागात व बल्लारशाह येथील डीएफओ पी. बी. धानके यांना चंद्रपूर येथील वन प्रशिक्षण संस्थेत पाठविण्यात आले आहे. तसेच पुणे येथील विभागीय वन अधिकारी एस. बी. फुले यांची धुळे येथे, कोल्हापूर येथील एस. बी. चच्हाण यांची सिंधुदुर्ग, धुळे येथील एन. एस. लडकत यांची कुंडल येथे, पुणे येथील अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील व्ही. डी. जवळेकर यांची सामाजिक वनीकरण, पुणे येथे बदली करण्यात आली आहे. याशिवाय सहायक वनसंरक्षकांमध्ये पालघर, डहाणू येथील आर. के. बोंगाळे यांची सामाजिक वनीकरण, ठाणे येथे जळगाव येथील आर. एम. सानप यांची नाशिक येथे, परतवाडा येथील के. डी. पेशने यांची गोंदिया येथे, यावल येथील एम. एन. खैरनार यांची शिरपूर येथे व नाशिक येथील कीर्ती जमदाडे यांची माणेगाव मंचेर येथील भीमाशंकर अभयारण्यात बदली झाली आहे.
वन विभागात बदली बॉम्ब!
By admin | Updated: June 4, 2014 01:09 IST