शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यात बॉयलरचा स्फोट

By admin | Updated: May 2, 2015 02:16 IST

कळमना भागातील चिखली ले-आऊट स्मॉल फॅक्टरी एरियात असलेल्या अन्नपूर्णा फूड प्रॉडक्ट नावाच्या मिठाई कारखान्यात ...

नागपूर : कळमना भागातील चिखली ले-आऊट स्मॉल फॅक्टरी एरियात असलेल्या अन्नपूर्णा फूड प्रॉडक्ट नावाच्या मिठाई कारखान्यात शुक्रवारी सायंकाळच्या वेळी बॉयलरचा भीषण स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत कारखान्याचा मालक ठार झाला तर १० कामगार गंभीररीत्या भाजून जखमी झाले. सर्वत्र कामगार दिन साजरा होत असताना ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. परिसर हादरलाया स्फोटाने संपूर्ण कळमना परिसर हादरला होता. काहींना तर भूकंपाचा आभास झाला. अन्नपूर्णा फॅक्टरीच्या दिशेने होत असलेली धावपळ पाहून लोकांना हा भूकंपाचा धक्का नाही याची जाणीव झाली. स्फोटामुळे कारखान्यातील साहित्य अस्ताव्यस्त झाले होते. मिठाईच्या भांड्यांमध्ये बॉयलर आणि काचेचे तुकडे जमा झाले होते. हादरा इतका जबरदस्त होता की, शेजारच्या कारखान्यातील खिडक्यांची तावदाने फुटली होती. अन्नपूर्णातील स्फोट झालेले बॉयलर हे सुरक्षा भिंतीला लागून असल्याने स्फोटामुळे ही भिंत शेजारच्या कारखान्याच्या भिंतीवर कोसळली.बजरंग जेठमल अग्रवाल, असे मृत कारखाना मालकाचे नाव आहे. गंभीररीत्या जखमी झालेल्यांमध्ये डिप्टी सिग्नल येथील रहिवासी प्रातिचंद बिसेन (२५), अग्नूराम शाहू (४०), नंदराज शाहू (२४), उमेश देशमुख (२५), सचिन टेंभेकर (२३) आणि मनोहर बिसेन (२५) यांचा समावेश आहे. जखमींना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. इस्पितळ सूत्रांच्या माहितीनुसार अग्नूराम , पुतण्या नंदराज यांच्यासह तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यापैकी नंदराज याला आॅक्सिजनवर ठेवण्यात आलेले आहे. अन्य कामगारांचे डोके, पोट, पाठ आणि हातांना गंभीर दुखापत झाली. प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार या कारखान्याच्या तळमजल्यावरील एका भागात ‘नमकीन’ तर दुसऱ्या भागात मिठाई तयार केली जाते. वरच्या माळ्यावर पॅकिंग केले जाते. घटनेच्या आधी कारखान्यात तीन बॉयलर सुरू होते. कारखान्याच्या उजव्या भागाकडे सुरक्षा भिंतीला लागून असलेल्या बॉयलरमध्ये बिघाड झाल्याची सूचना कामगारांनी मालक अग्रवाल यांना दिली होती. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अग्रवाल आणि मेकॅनिक हे बॉयलर दुरुस्तीसाठी आले. मेकॅनिक नट-बोल्ट लावत होता.अग्रवाल हे बॉयलरजवळ उभे राहून काम पाहत होते. त्याच वेळी अचानक या बॉयलरचा भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर बॉयलरचे तुकडे अग्रवाल यांच्या पोटात आणि शरीराच्या अन्य भागात शिरले. परिसरात काम करणारे अन्य कामगारही या स्फोटात जखमी झाले. स्फोटाचा आवाज इतका भयानक होता की, अन्य कारखान्यातील कामगार आणि परिसरातील लोक घटनास्थळी धावून आले. काहींनी पोलीस, अ‍ॅम्बुलन्स आणि अग्निशामक दलाला सूचना दिली. अवघ्या १५ मिनिटातच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पोलीस मात्र उशिरा घटनास्थळावर आले. काही कामगारांनी जखमी कामगारांना कारखान्याच्या बाहेर काढणे सुरू केले. परिसरातील लोकांनीही चार चाकी वाहनांना रोखले. या वाहनांमधून जखमींना वर्धमाननगरातील धर्मार्थ इस्पितळात नेण्यात आले. (प्रतिनिधी)