शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलच्या नावावर पाठविण्यात येताहेत बोगस मेसेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:06 IST

नागपूर : मोबाइल आणि इंटरनेटच्या वाढत्या उपयोगासह आता सायबर क्राइमचा टप्पा वाढत आहे. याच कारणांनी मोबाइल ओटीपी, लिंकच्या माध्यमातून ...

नागपूर : मोबाइल आणि इंटरनेटच्या वाढत्या उपयोगासह आता सायबर क्राइमचा टप्पा वाढत आहे. याच कारणांनी मोबाइल ओटीपी, लिंकच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार बँकांमधून लोकांची रक्कम लंपास करीत आहेत. याच श्रृंखलेत सध्या भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) नावाने मोबाइलधारकांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर बोगस मेसेज पाठविण्यात येत आहेत. या माध्यमातून त्यांची फसवणूक करण्यात येत आहे.

प्रिय ग्राहक तुमचे बीएसएनएल सिम आज एक्स्पायर होत असून, कृपया कस्टमर केअर क्रमांकावर २४ तासांच्या आत संपर्क साधावा, असे ग्राहकांना पाठविण्यात येणाऱ्या मेसेजमध्ये लिहिले आहे. या मेसेजची शहानिशा करण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधीने मेसेजवर दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता तो मोबाइल पश्चिम बंगालचा होता. मोबाइल क्रमांक व्यस्त असल्याने बंगाली भाषेत संदेश येत होता. त्यानंतर प्रतिनिधीने ज्या मोबाइल क्रमांकावरून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आला होता, त्यावर कॉल केला तेव्हा एका व्यक्तीने संवाद साधला. तुम्ही कुठून बोलता, असे प्रतिनिधीने विचारले असता तो उत्तर देण्यास टाळाटाळ करू लागला. यावरून स्पष्ट होते की, सिम एक्स्पायर होत असल्याचा आलेला मेसेज बोगस होता.

यासंदर्भात बीएसएनएलचे जनसंपर्क अधिकारी समीर खरे यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, अशा प्रकारचे बोगस मेसेज बीएसएनएलच्या ग्राहकांना पाठविण्यात येत आहेत. ग्राहकांनी या मेसेजबाबत सतर्क राहावे. बीएसएनएल असे कोणतेही मेसेज ग्राहकांना पाठवित नाही. विभाग मेसेज पाठविणाऱ्यांचा शोध घेत आहे.