शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाचा निर्घृण खून

By admin | Updated: April 8, 2015 02:40 IST

अमरावती मार्गावरील वाडीस्थित पेट्रोल पंपसमोर तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

वाडी : नागपूर - अमरावती मार्गावरील वाडीस्थित पेट्रोल पंपसमोर तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. दगडाने ठेचून मृताचा चेहरा छिन्नविछिन्न करण्यात आला होता. यामुळे ओळख पटविण्यात बऱ्याच अडचणी येत होत्या. खुनाच्या या घटनेमुळे वाडी परिसरात खळबळ उडाली.पिंटू ऊर्फ हरिदास तुळशीराम सूर्यवंशी (२५) रा. माहुली ता. खंडेश्वर जि. अमरावती असे मृताचे नाव आहे. तो वर्षभरापूर्वी शिवाजीनगर, दखने मोहल्ला वाडी येथे काका गणेश लक्ष्मण सूर्यवंशी यांच्याकडे राहायला आला होता. दरम्यान पिंटूला दारूचे व्यसन लागल्याने गणेश यांनी त्याला त्यांच्याकडे राहण्यास मनाई केली होती. तेव्हापासून पिंटू हा दिवसभर मोलमजुरी, हमालीचे काम करून रात्री बाहेरच जेवण करून जागा मिळेल तिथे झोपायचा. यादरम्यान त्याची अन्य दारुड्या मित्रांशी ओळख झाली. सोमवारी रात्री मद्यप्राशन आणि जेवण करून तो वाडीतील पेट्रोल पंपसमोर झोपला होता. त्याच्या बाजूला दुसरी एक व्यक्ती झोपलेली होती. मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यादरम्यान बाजूच्या व्यक्तीलासुद्धा काहीच आवाज आला नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. सकाळच्या सुमारास खुनाची ही घटना लक्षात येताच पोलिसांना सूचना करण्यात आली. त्या माहितीच्या आधारे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृताचा चेहरा चेंदामेंदा झाला होता. त्यामुळे ओळख पटविण्यास बऱ्याच अडचणी आल्या. अखेर तो मृतदेह पिंटूचा असल्याचे स्पष्ट झाले.खुनाच्या या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निर्मलादेवी यांनी वाडी पोलीस ठाण्याला भेट देऊन अधिक माहिती जाणून घेतली. याप्रकरणी वाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक आर. एल. शिंदे हे तपास करीत आहे. आतापर्यंत चार संशयितांना ताब्यात घेतले असून मृताच्या बाजूला झोपलेल्या व्यक्तीचाही त्यामध्ये समावेश आहे. (प्रतिनिधी)\