शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील तरुणाच्या संशोधनावर जर्मनीची मोहोर

By admin | Updated: October 28, 2014 00:27 IST

प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतलेल्या एका तरुणाच्या इंग्रजी साहित्यातील संशोधनावर आंतरराष्ट्रीय मोहोर उमटली आहे. जर्मनीच्या एका प्रकाशनाने त्याचा संशोधन ग्रंथ प्रसिद्ध केला आहे.

इंग्रजी साहित्य : पुस्तक रुपाने संशोधन प्रसिद्ध यवतमाळ : प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतलेल्या एका तरुणाच्या इंग्रजी साहित्यातील संशोधनावर आंतरराष्ट्रीय मोहोर उमटली आहे. जर्मनीच्या एका प्रकाशनाने त्याचा संशोधन ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. चेहऱ्यावरील हावभावातून मनातील भावनांचे प्रगटीकरण शोधण्याचा प्रयत्न त्याने या संशोधनातून केला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ब्रम्ही या छोट्याश्या खेड्यात राहणाऱ्या या तरुणाचे नाव आहे गणेश बळवंत मुंढे. ग्रामीण भागात राहून इंग्रजी वाङ्मयात संशोधन करणारा गणेश हा शेतकरी कुटुंबातील आहे. घरी कोणतेही साहित्यिक वातावरण नाही, इंग्रजीचा दूरदूरचा संबंध नाही. मात्र आपल्या कुशाग्र बुद्धीमत्तेच्या जोरावर त्याने पुणे विद्यापीठातून इंग्रजी वाङ्मयात पदव्युत्तर पदवी घेतली. यावरच तो थांबला नाही तर त्याने इंग्रजी साहित्यात संशोधन सुरु केले. पुणे विद्यापीठातून एमफील करताना ‘अ स्टडी आॅफ कर्न्व्हसेशनल प्रिंसीपल अ‍ॅन्ड अ‍ॅब्सुलिटी इन सॅम्युअल बॅकेट एन्ड गेम’ या विषयावर संशोधन केले. माणसाच्या मनातील भावना सहसा कुणालाही कळत नाही. परंतु त्याचा चेहरा मात्र सारेच भाव सांगून जातो. मनात दडलेल्या या भावना नेमक्या कशा ओळखायच्या यावर त्याने संशोधन केले. आंधळा, मुका, बहिरा आणि अपंग अशा चार जणांची कहाणी त्याने डोळ्यासमोर ठेवली. ते आपल्या समस्यांचे निराकारण कसे करतात, त्यांचे भाव कसे प्रगट होतात यावर संशोधन केले. एमफीलच्या या प्रबंधाला आता आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. जर्मनीच्या लँबर्ड पब्लिकेशनने हा संशोधन ग्रंथ प्रकाशित केला आहे. जागतिक स्तरावर या पुस्तकाला मान्यता मिळाली असून त्याला आंतरराष्ट्रीय पुस्तक मानांकनाचा दर्जाही मिळाला आहे. तसेच या संशोधनाचे पेटंट करण्याचा प्रयत्न तो करीत आहे. गणेश हा सध्या पुणे येथील राजर्षी शाहू कॉलेज आॅफ इंजिनिअरींगमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून याच विषयावर त्याला पीएचडीसाठी संशोधन करावयाचे आहे. एका ग्रामीण भागातील तरुणाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले संशोधन पोहोचविले. ग्रामीण भागातील तरुणही संशोधनाच्या क्षेत्रात मागे नाहीत, हे त्याने सिद्ध केले. (प्रतिनिधी)