शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

काळा पैसा जमा करणाऱ्यांची उलटी गिनती सुरू

By admin | Updated: January 23, 2017 22:30 IST

नोटाबंदीच्या दरम्यान बँकेत अडीच लाखापेक्षा जास्त रक्कम जमा करणाऱ्यांची उलटी गिनती सुरु झाली आहे.

 ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 23 -  नोटाबंदीच्या दरम्यान बँकेत अडीच लाखापेक्षा जास्त रक्कम जमा करणाऱ्यांची उलटी गिनती सुरु झाली आहे. आयकर विभागाने नोटाबंदी दरम्यान अडीच लाख रूपयापेक्षा अधिक रक्कम जमा करणाऱ्यांबाबतचा अहवाल विदर्भातीलसर्वच टपाल कार्यालय आणि सहकारी बँकांना मागविला आहे. नोटाबंदीदरम्यान अघोषित रक्कम जमा करण्यासाठी लोकांनी टपाल आणि सहकारी बँकांचा वापर केल्याचे आयकर विभागाचे मानने आहे. आयकर विभागाच्या दक्षता आणि गुन्हे तपास शाखेतर्फे सोमवारी नागपूर विभागातील टपाल कार्यालय आणि सहकारी बँकांमध्ये नोटाबंदी दरम्यान जमा करण्यात आलेल्या रकमेबाबतचा अहवाल देण्यासंदर्भात तांत्रिक मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यात आयकर विभागाच्या दक्षता व गुन्हे तपास शाखेचे निदेशक सुरेश बत्तीनी, सहआयुक्त किशोर धुळे, पोस्ट मास्टर जनरल मरियम्मा थॉमस आणि आयकर विभागाच्या उपनिदेशक कौमुदी पाटील उपस्थित होत्या. सहकारी बँक आणि टपाल खात्यातील प्रतिनिधींना मार्गदर्शन करतांना सुरेश बत्तीनी यांंनी सांगितले की, आयकर विभागाला मिळणाऱ्या माहितीचे मुख्य स्त्रोतांमध्ये सहकारी बँक आणि टपाल कार्यालय हे प्रामुख्याने सहभागी आहे.  नोटाबंदी दरम्यान ८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०१६ दरम्यान अनेक लोकांनी आपला पैैसा टपाल आणि सहकारी बँकेत जमा केला. माहितीनुसार नागपूर विभागात ५० हजार कोटी रूपये अतिरिक्त जमा झाले आहेत. नोटाबंदीची कालमर्यादा संपल्यानंतर आता आयकर विभागाचे काम सुरू झाले आहे. रोख काळापैसा ठेवणाऱ्यांनी अनेक बँकांमध्ये वेगवेगळ्या नावाने खाते उघडून पैसे जमा केले आहेत. किंवा अनेक लोकांच्या नावाने पैसे जमा केले आहेत. यासाठी सहकारी बँक व टपाल कार्यालयांना आयकर विभागाने नोटाबंदी दरम्यान पैसा जमा करणाऱ्यांचा अहवाल घेण्यासाठी एक विशेष वित्तीय व्यवहार स्टेटमेंट (स्पेशल एसटीएफ) फॉर्म तयार केला आहे. हा फामॅ भरून ३१ जानेवारीपूर्वी आयकर विभागाला एसटीएफ पाठवायचा आहे. यासाठी बँकांकडून आयकर विभगाप्रती उत्तरदायी म्हणून एका व्यक्तीला नियुक्त केले जाईल. आयकर विभागाला आहे यांचा शोधज्या व्यक्तिने आपल्या एका किंवा यापेक्षा अधिक खात्यांमध्ये नोटाबंदी दरम्यान ५० दिवसाच्या कालावधीत एकूण अडीच लाख रूपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा केली त्यांचे नाव आयकर विभागाला पाठवावयाचे आहे. परंतु एखाद्या व्यक्तीने आपल्या करंट अकाऊंटमध्ये १ एप्रिल ते ८ नोव्हेंबर २०१६ दरम्यान १२.५ लाख रूपये जमा केले असेल (हळु-हळू किंवा एकाचवेळी) आणिनोटाबंदी दरम्यान त्याने अडीच लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा केली असेल तर तो चौकशीसाठी पात्र ठरणार नाही. परंतु १ एप्रिल ते ८ नोव्हेंबर २०१६ दरम्यान १२.५ लाख रूपयापेक्षा कमी रक्कम जमा करणाऱ्या व्यक्तीने नोटाबंदी दरम्यान अडीच लाख रूपये जमा केले असेल तर तो चौकशीच्या घेऱ्यात येईल. ८ नोव्हेंबरपूर्वी आणि ८ नोव्हेंबरनंतर पैसे जमा करणाऱ्यांना एसएफटी आणि स्पेशल एसएफटी अशा दोन श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे.पॅन कार्डने लागणार पैसा जमा करणाऱ्यांचा शोधअनेक लोकांनी वेगवेगळ्या बँकंमध्ये ५०-५० हजार रूपये जमा केले. इतक्या रकमेसाठी पॅन कार्ड आवश्यक करण्यात आले होते. ज्या लोकांनी वेगवेगळ्या नावांनी पैसा जमा केला आहे, ते पॅन कार्ड नंबरने पकडले जाऊ शकतात. ज्या लोकांकडे पॅन कार्ड नाही, त्यांना आधार कार्ड आवश्यक होते. आता एसएफटी अहवाल देतांना बँकांना संशयास्पद ग्राहकांचे पॅन कार्ड आणि ते नसेल तरआधार कार्ड देणे आवश्यक राहील.