शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडव्यानंतर भाजपाचे मिशन लोकसभा

By admin | Updated: March 16, 2017 02:13 IST

महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने एकतर्फी विजय नोंदवित हॅट्ट्रिक साधली. कधीनव्हे ते तब्बल १०८ जागा निवडून आल्या.

बूथ प्रमुखांपासून पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी : प्रत्येक मतदारापर्यंत पोहचणार नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने एकतर्फी विजय नोंदवित हॅट्ट्रिक साधली. कधीनव्हे ते तब्बल १०८ जागा निवडून आल्या. यामुळे भाजपाचा आत्मविश्वास दुणावला आहे. मात्र, असे असले तरी या विजयाची पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सुस्ती चढू नये याची भाजपाने विशेष काळजी घेतली आहे. गुढीपाडव्यानंतर भाजप लोकसभेची गुढी उभारण्याचे मिशन हाती घेणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ५ लाख ८७ हजार ७६७ मते मिळाली होती. त्यांनी काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचा २ लाख ८४ हजार ८२८ मतांनी पराभव केला होता. आता महापालिकेतील एकतर्फी यशानंतर लोकसभेतही पूर्वीपेक्षा जास्त मताधिक्य मिळविण्याचे आव्हान भाजपासमोर असणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारांपर्यंत कसे पोहचता येईल, त्याला भाजपाशी कसे जोडता येईल, याची तयारी सुरू झाली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत शहरातील बूथची संख्या जवळपास दुप्पट झाली. असे असले तरी भाजपने तत्काळ सर्वच्या सर्व २८०० हून अधिक बूथवर बूथप्रमुख नेमले. यामुळे भाजपचा संघटनात्मक विस्तार होण्यास मदत झाली आहे. आता या बूथ प्रमुखांच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक भागात विविध मोहीम, अभियान व कार्यक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.(प्रतिनिधी) सोशल इंजिनिअरिंगवर भर बौद्ध, तेली, कुणबी, माळी अशा समाजांसोबत संख्येने कमी असलेल्या लहान समाज घटकांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात येत आहे. एप्रिलपासून या समाज घटकांच्या प्रमुखांची भाजपा पदाधिकारी भेट घेणार असून, त्यांना पक्षाशी जुळण्याची विनंती करणार आहे. नितीन गडकरी यांनी राबविलेली सामाजिक समरसता या समाजप्रमुखांना पटवून दिली जाणार आहे. याशिवाय केरळ, बिहार येथील नागपुरात वास्तव्यास असलेले लोक, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय लोकांच्या समूहांना भेटी देऊन त्यांच्या स्वतंत्र बैठका आयोजित केल्या जाणार आहेत. आमदारांवर प्रमुख जबाबदारी आपापल्या विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे समन्वय साधून पक्षाचे कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी आमदारांवर सोपविली जाईल. कोणत्या भागात पक्ष संघटनेच्या माध्यमातून अधिक लक्ष देणे आवश्यक आहे, कुठले कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे सोबत कोणत्या भागात महापालिकेच्या माध्यमातून अधिक विकास कामे करणे आवश्यक आहे, याचे नियोजन आमदारांच्या माध्यमातून करण्याचा विचार आहे. गडकरींच्या वाढदिवशी फोडणार नारळ २७ मे रोजी नितीन गडकरी यांना वयाची ६० वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने शहरात एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन केले जात आहे. या दिवसाचे निमित्त साधत लोकसभेच्या तयारीचे नारळ फोडायचे व कार्यकर्त्यांना कामाला लावायचे, अशी तयारी पक्षात सुरू झाली आहे. सिमेंट रस्ते अन् मेट्रो रेल्वेचे मार्केटिंग पुण्यातील मेट्रोचे पिलर अद्याप उभे झालेले नाही. नागपुरात मात्र काम झपाट्याने सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनावर घेतल्यामुळे नागपूरकरांचे मेट्रो रेल्वेचे स्वप्न साकार होत आहे, असे मार्केटिंग पक्षातर्फे जोरात केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी नागपूरकरांना मेट्रो धावताना दिसेल. वर्षभरात शहरात सिमेंट रस्त्यांचे जाळे तयार झालेले असेल.