शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडील ४ जागांवर आघाडीचा ५०-५० चा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:07 IST

नागपूर : एकीकडे काँग्रेसच्या नेत्यांनी स्वबळाचा झेंडा हाती घेतला, तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनीच राष्ट्रवादीला बैठकीचे आमंत्रण ...

नागपूर : एकीकडे काँग्रेसच्या नेत्यांनी स्वबळाचा झेंडा हाती घेतला, तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनीच राष्ट्रवादीला बैठकीचे आमंत्रण दिले. दोन्ही पक्षांचे सदस्यत्व रद्द झालेल्या जागांवर ‘सिटिंग गेटिंग‌’ ठरले; पण भाजपकडे असलेल्या ४ जागांवर कुणी निवडणूक लढावी हे कोडे काही सुटलेले नाही. राष्ट्रवादीने या चार जागेवर फिप्टी-फिप्टीचा प्रस्ताव काँग्रेसला दिला. काँग्रेसने त्यावर वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे.

शेतकरी भवनात पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना बैठकीसाठी आमंत्रित केले होते. राष्ट्रवादीचे माजी मंत्री रमेश बंग व जिल्हाध्यक्ष बाबा गुजर हे बैठकीला उपस्थित होते. बैठकीत काँग्रेसच्या जे सर्कल रद्द झाले. त्या सर्कलवर काँग्रेस लढणार व राष्ट्रवादीच्या रद्द झालेल्या सदस्यांच्या जागेवर राष्ट्रवादीच लढणार हे सूत्र आघाडीसाठी पोषक ठरले; पण उरलेल्या भाजपाच्या चार जागा लढण्यासंदर्भात राष्ट्रवादीने काँग्रेसपुढे प्रस्ताव ठेवला. यात गुमथळा आणि राजोला या सर्कलमध्ये राष्ट्रवादीला उमेदवारी देण्याचा प्रस्ताव बैठकीत ठेवला; पण या निर्णयावर बैठकीत तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे पुन्हा बैठक होणार असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी सांगितले.

- सेनेने पुढाकार घेऊनही प्रतिसाद नाही

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे शिवसेनेने पुढाकार घेऊन राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांशी संपर्क साधला; पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शिवसेनेने १६ जिल्हा परिषद व ३१ पंचायत समित्या स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

-संदीप इटकेलवार, जिल्हाप्रमुख, शिवसेना