शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा १७५ जागा जिंकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:16 IST

केंद्र व राज्य सरकार लोकहिताचे काम करीत आहे. जनता सरकारवर खूश आहे. भाजपातर्फे नुकतेच राज्यात एक सर्वेक्षण करण्यात आले.

ठळक मुद्देसर्वेक्षण केल्याचा बावनकुळेंचा खुलासा फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री भाजपा शहर कार्यकारिणी बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र व राज्य सरकार लोकहिताचे काम करीत आहे. जनता सरकारवर खूश आहे. भाजपातर्फे नुकतेच राज्यात एक सर्वेक्षण करण्यात आले. यात भाजपाला तब्बल १७५ जागा मिळत असल्याचे समोर आले आहे, असा खुलासा करीत देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा दावा ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.भाजपाच्या नाागपूर शहर कार्यकारिणीची बैठक पूर्व लक्ष्नीनगरातील मैदानावर रविवारी सकाळी सुरू झाली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्घाटन केले. यावेळी शहर अध्यक्ष आ. सुुधाकर कोहळे, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, खा.अजय संचेती, आ. सुधाकर देशमुख, आ.कृष्णा खोपडे,आ. डॉ. मिलिंद माने, आ. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, आ. विकास कुंभारे, महापौर नंदा जिचकार, श्रीकांत देशपांडे, शहर महामंत्री संदीप जोशी, संदीप जाधव, भोजराज डुंबे, माजी महापौर अर्चना डेहनकर आदी उपस्थित होते. यावेळी बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांसमक्ष भाजपातर्फे करण्यात आलेल्या गुप्त सर्वेक्षणाचा खुलासा करताच कार्यकर्त्यांनी गडकरी- फडणवीसांचा जयघोष केला. बावनकुळे म्हणाले, राज्यातच नव्हे तर केंद्रातही पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार येणार आहे. नागपुरात नितीन गडकरी यांचा विजयरथ थांबविणे कठीण आहे. भाजपा केंद्रात ३९९ जागा जिंकणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ३५ हजार कोटींची कर्जमाफी केली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. विरोधक शेतकºयांची दिशाभूल करू पाहत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सरकारने घेतलेले निर्णय शेतकरी व जनतेसमोर मांडण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.कोर्टाचे निर्णय जनतेला सांगाडीजे वाजवू नका, महामार्गापासून दारूची दुकाने ५०० मीटरपेक्षा जास्त अंतरावर हवीत, असे काही निर्णय न्यायालयाने घेतले आहेत. नंतर न्यायालयानेच त्यातून मार्ग काढले. मात्र, या निर्णयांमुळे जनतेत सरकारविषयी रोष निर्माण होतो. अशावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन यात सरकारची चूक नाही हे जनतेला पटवून द्यावे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.ंमोदी, गडकरी, फडणवीस यांचे अभिनंदनकार्यकारिणीच्याा पहिल्या सत्रात आ. सुधाकर देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंंदनाचा प्रस्ताव मांडला. मुख्यमंत्र्यांंनी शेतकºयांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी, घेतलेले लोकोपयोगी निर्णय, राज्यात आणलेली गुंतवणूक आदी बाबींसाठी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यात आले. दुसºया सत्रात खा. अजय संचेती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्याला आ. अनिल सोले व आ. डॉ. मिलिंद माने यांनी अनुमोदन दिले. तर समारोपीय सत्रात शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. गडकरी यांनी भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्रालयाच्या माध्यमातून देशाला विकासाची दिशा दिली. त्यांच्या कामामुळे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्याकडे जलसंपदा मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभारही दिला. त्यांनी नागपूरसह विदर्भाच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले, असे कोहळे यांनी प्रस्ताव मांडताना सांगितले. सर्व प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आले.पाच बूथवर एक पालक नेमणार : कोहळेशहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांनी प्रास्ताविकातून पक्षसंघटनेचा आढावा मांडला. शहरात १ हजार ७८४ बूथची बांधणी पूर्ण झाली आहेत. बूथवर मतदार याद्या पोहचविण्यात आल्या आहेत. मतदार यादीसाठी पेज प्रमुख नेमणार आहोत. पेज प्रमुखाने त्या पेजवरील मतदारांशी संपर्क सधायचा आहे. याशिवाय प्रत्येक पाच बूथसाठी एक पालक नेमला जाईल. संबंधित पाच बूथचा आढावा हा पालक घेईल व प्रभाग अध्यक्षांकडे सादर करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मतदारांशी संपर्क करणे हाच विजयाचा मूलमंत्र आहे. शहरात ६२ हजार कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. या कामांचा प्रचार- प्रसार व्हायला हवा. त्यासाठी घरात बसू नका, संपर्क वाढवा, असे आवाहन कोहळे यांनी केले.विधानसभानिहाय आढावा सादरबैठकीत मंडळ अध्यक्षांनी विधानसभानिहाय आढावा सादर केला. मतदारसंघातील प्रत्येक प्रभागाची कार्यकारिणी झाली आहे का, आघाड्यांची रचना झाली का, पक्षातर्फे सहा महिन्यात कोणते कार्यक्रम राबविण्यात आले, आदी माहिती मंडळ अध्यक्षांनी दिली.