शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

भाजप १२५ पेक्षा अधिक जागा जिंकणार

By admin | Updated: January 1, 2017 02:55 IST

नागपूर शहरात ३२ हजार कोटींच्या विकास कामांचे कार्यादेश देण्यात आलेले आहेत.

नितीन गडकरी : सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचे भूमिपूजन नागपूर : नागपूर शहरात ३२ हजार कोटींच्या विकास कामांचे कार्यादेश देण्यात आलेले आहेत. यातील अनेक कामे सुरू झालेली आहेत. नागपूर शहर देशातच नव्हे तर जगात प्रथम क्रमांकाचे शहर म्हणून ओळखले जाईल. शहराचा चौफैर विकास होत असल्याने महापालिका निवडणुकीत भाजपा १२५ पेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याचा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. प्रभाग क्रमांक ३० मधील बिडीपेठ व आशीर्वाद नगर येथील सिमेंट क्रॉंक्रिट रस्त्यांचे भूमिपूजन व कार्यकर्ता मेळव्यात गडकरी बोलत होते. व्यासपीठावर भाजपचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, आ. प्रा. अनिल सोले, विकास कुंभारे,उपमहापौर सतीश होले,माजी महापौर कल्पना पांडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रमेश सिंगारे, रवींद्र भोयर, नगरसेविका निता ठाकरे, रिता मुळे, स्वाती आखतकर, बळवंत जिचकार, संजय ठाकरे, दिव्या घुरडे आदी उपस्थित होते. शहरातील गरीब लोकांना घरे मिळावी या हेतूने ५० हजार घरे बांधण्याचा उपक्रम राबविला जात आहे. मेट्रो रेल्वे लवकरच धावणार आहे. २४ तास पाणी,दूषित पाण्याचा पुनर्वापर, कचऱ्यापासून वीज निर्मिती, ग्रीन बस अशा प्रकल्पांना सुरुवात झाल्याची माहिती गडकरी यांनी दिली. नासुप्र बखास्त करु न गेल्या ८१ वर्षापासून होणारी शहरातील नागरिकांची पिळवणूक थांबविण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या नेतृत्वामुळे झोपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप होत आहे. शहराच्या विकासासाठी महापालिका निवडणुकीत भाजपला निवडून द्या, असे आवाहन सुधाकर कोहळे यांनी केले. यावेळी रमेश सिंगारे, रिता मुळे, स्वाती आखतकर, व रवींद्र भोयर यांच्या कार्यअहवालाचे वाचन करण्यात आले. अजय बुगेवार, अजय खडतकर, बाजीराव राकस, ईश्वर धांडे, पुरुषोत्तम कुथे, फियाज खान, प्रीती राजदेकर, संगीता बनाफर, मोनिका राय, विलास करांगळे, अभय घोटेकर, प्रशांत कामडी, किशोर पेठे, सूर्यकांत शिरसाट आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)