शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

भाजप म्हणते प्रार्थनास्थळे उघडा, बाकी म्हणतात वाट बघा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडावी यासाठी भाजपने राज्यभरात आंदोलन केले. राज्य शासनाने मद्यालयांना परवानगी दिली असताना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडावी यासाठी भाजपने राज्यभरात आंदोलन केले. राज्य शासनाने मद्यालयांना परवानगी दिली असताना श्रावणात शिवालयांत प्रवेशबंदी का असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे, परंतु नागपुरातील इतर प्रमुख पक्षांकडून मात्र मंदिर उघडण्याला विरोध करण्यात येत आहे. सध्या ‘वेट ॲन्ड वॉच’ हीच भूमिका घेणे समाजाच्या हिताचे राहील, असे पक्षनेत्यांचे म्हणणे आहे.

प्रार्थनास्थळे उघडायलाच हवी : भाजप

गेल्या दीड वर्षापासून मंदिर बंद असल्यामुळे मंदिरावर उपजीविका अवलंबून असणाऱ्यांचे रोजगार बंद असल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. इतर राज्यातील मंदिरे सुरु असून महाराष्ट्रातील मंदिरे मात्र बंद आहेत. एकीकडे सरकारने मद्यालयांना परवानगी दिली आहे. तिकडे गर्दी होत नाही का व ‘कोरोना’चा संसर्ग होत नाही का.

- आ.प्रवीण दटके, शहराध्यक्ष, भाजप

कोरोनाला परतावल्यानंतरच मंदिरे उघडावीत : शिवसेना

शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र पक्षाच्या इतर नेत्यांशी चर्चा केली असता सध्या ‘कोरोना’पासून बचाव महत्त्वाचा असल्याने मंदिरे उघडण्याची आवश्यकता नाही हीच पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच याबाबत भावना मांडल्याने त्यांना शिवसेना नेत्यांचे समर्थनच आहे.

प्रार्थनास्थळे उघडल्यानंतर नुकसान झाले तर : काँग्रेस

प्रार्थनास्थळे उघडावी ही मागणी होत आहे; मात्र प्रार्थनास्थळे उघडल्यानंतर ‘कोरोना’चा संसर्ग वाढला तर समोर येणाऱ्या परिस्थितीला जबाबदार कोण राहणार. प्रार्थनास्थळांचा आडोसा घेऊन केंद्र शासनाचे अपयश लपविण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरू आहे.

- आ.विकास ठाकरे, शहराध्यक्ष, कॉंग्रेस

देवाला सध्या घरीच पूजावे - राष्ट्रवादी कॉंग्रेस

सध्या सणासुदीचे दिवस असल्याने प्रार्थनास्थळे उघडायला हवी असे अनेकांना वाटते. मात्र स्थिती तशी नाही याची त्यांना जाण आहे. केवळ भाजपकडूनच अशी मागणी होते आहे. ‘कोरोना’चे संकट पाहता लोकांनी काही दिवस घरूनच देवाचे पूजन करणे हिताचे राहील.

- दुनेश्वर पेठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

हजारो कोटींची उलाढाल ठप्प

श्रावण महिन्यांत श्रावण सोमवारसह विविध सण असतात. याशिवाय अनेक मोठ्या मंदिरांमध्ये लोक दर्शनाला जात असतात; मात्र प्रार्थनास्थळांमध्ये प्रवेशबंदी असल्याने तेथे विक्री करणाऱ्यांचे हाल होत आहेत. शिवाय मंदिरांना मिळणाऱ्या देणग्यांवरदेखील मोठा परिणाम झाला आहे. जर एकूण चित्र पाहिले तर नागपूर व जिल्ह्यात पाचशे कोटींहून अधिकची उलाढाल ठप्प आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. शिवाय पाच हजारांहून अधिक जण बेरोजगार झाले आहेत.