शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

भाजप, काँग्रेसला नको मित्रपक्षांची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2016 02:33 IST

विधानसभा निवडणुकीत आघाडी अन् युती तुटली. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना हे चारही प्रमुख पक्ष स्वबळावर लढले.

महापालिका स्वबळावरच : स्थानिक नेत्यांची भूमिकानागपूर : विधानसभा निवडणुकीत आघाडी अन् युती तुटली. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना हे चारही प्रमुख पक्ष स्वबळावर लढले. आता येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीतही आघाडी व युती होण्याची शक्यता कमीच आहे. मित्रपक्षासाठी जागा सोडण्यापेक्षा आपल्या स्थानिक कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन बळ देण्याचा काँग्रेस व भाजपचा विचार आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने महापालिकेची निवडणूक होणार असल्यामुळे युती किंवा आघाडी करून काहीच फायदा होणार नाही, असे या दोन्ही पक्षातील नेत्यांचे मत आहे.महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी व भाजप- शिवसेना युती करून लढली. जागा वाटपाच्या वेळी भाजपला काही महत्त्वाच्या जागा शिवसेनेच्या हट्टासाठी सोडाव्या लागल्या. तर काँग्रेसलाही राष्ट्रवादीसाठी एक पाऊल मागे घ्यावे लागले. स्वत:कडे पर्यायी तगडे उमेदवार असलेल्या तसेच जिंकण्याची शक्यता असलेल्या जागा मित्रपक्षांसाठी सोडल्यामुळे काँग्रेस व भाजपला नुकसान सहन करावे लागले. काही जागा अशा होत्या की त्या ठिकाणी काँग्रेस, भाजपा लढली असती तर विजय नोंदविला असता. मात्र, राष्ट्रवादी व शिवसेनेसाठी सोडण्यात आल्यामुळे गमवाव्या लागल्या. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सहा व शिवसेनेलाही सहाच जागा जिंकता आल्या. मात्र, आता या सहा जागांसाठी २५ ते ३५ जागांसाठी तडजोड करण्यास काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांचे नेते तयार दिसत नाहीत. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत सहज विजय मिळविता येईल, अशी शिवसेना व राष्ट्रवादीची शहरात स्थिती नाही. दोन्ही पक्षाचे काही नगरसेवक व काही इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये स्वबळावरही विजयी होण्याची क्षमता आहे. मात्र, सर्वच प्रभागात असे चित्र नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे नेते आघाडी व युतीसाठी इच्छुक असल्याचे जाणवते. नुकत्याच झालेल्या भाजपच्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीत नेत्यांनी उघडपणे ‘एकला चलोरे’चा नारा दिला. आपल्याच पक्षात सक्षम कार्यकर्ते आहेत, त्यामुळे आता इतरांशी हातमिळवणी कशासाठी करायची, नागपुरात शेवटच्या घटका मोजत असलेल्या शिवसेनेशी युती करून ग्लुकोज कशासाठी द्यायचे, असे प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, यावर शिवसेनेकडून कुठलेही उत्तर देण्यातआले नाही. शिवनसेना नेत्यांनी सोयीस्कर मौन बाळगले. त्यामुळे भाजपचे मनोबल आणखी उंचावले आहे. दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादीचेही जुळण्याची शक्यता कमीच आहे. राष्ट्रवादीमुळे गेल्यावेळी काँग्रेसचे नुकसान झाले, असा काँग्रेस नेत्यांचा दावा आहे. चारच्या प्रभागात राष्ट्रवादीचा भार कशासाठी उचलायचा, तसेही राष्ट्रवादीचे तगडे उमेदवार आमच्या संपर्कात आहेत, निवडणुकीच्या पूर्वी ते काँग्रेसवासी झालेले दिसतील, असे नेत्यांचे म्हणणे आहे. तर खा. प्रफुल्ल पटेल हे नागपूरचे प्रभारी झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला आहे. आपण लोकसभा, विधानसभेची निवडणूक लढत नाही. काँग्रेसच्या मागे राहावे लागते. त्यामुळे पक्ष वाढत नाही. आता महापालिकेच्या निवडणुकीत सर्व जागा स्वबळावर लढवून कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली तर प्रत्येक प्रभागात पक्षाचा कार्यकर्ता तयार होईल. त्याचा भविष्यात पक्षाला फायदा होईल, असे विश्लेषण राष्ट्रवादीचे नेते देत आहेत.(प्रतिनिधी) राष्ट्रवादीचा बसपाशी तर काँग्रेसचा रिपाइंशी युतीचा प्रयत्नआपल्या परंपरागत मतांची विभागणी होऊ नये यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीने आतापासूनच हालचाली सुरू केल्या आहेत. बसपाशी युती करता येईल का, यावर राष्ट्रवादीमध्ये विचारमंथन सुरू आहे. तर काँग्रेस रिपाइंच्या विविध गटांना एकत्र करून सोबत घेण्याच्या विचारात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही पक्षांना बसपा व रिपाइंकडून सध्यातरी अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.