शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

बिस्किटचा मुदतबाह्य साठा जप्त

By admin | Updated: August 25, 2015 03:30 IST

बिस्किट खाताय सावधान! एका नामांकित कंपनीचा लाखो रुपये किमतीचे मुदतबाह्य बिस्किट आणि अन्नपदार्थांचा

नागपूर : बिस्किट खाताय सावधान! एका नामांकित कंपनीचा लाखो रुपये किमतीचे मुदतबाह्य बिस्किट आणि अन्नपदार्थांचा साठा अन्न व प्रशासन विभागाने (एफडीए) सोमवारी धाड टाकून जप्त केला. या धाडीमुळे अवैध विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, या कंपनीची मुदतबाह्य बिस्किटे बाजारात विक्रीस तर नाही ना, याचा शोध आता एफडीएचे अधिकारी घेत आहेत. प्राप्त माहितीनुसार, विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळी ८ वाजता शास्त्रीनगर भागातील योगेश ग्वालानी याच्या घरी धाड टाकली. या ठिकाणी एका कंपनीचे नमकीन, बिस्किट, केक, व्हेपर्स इत्यादी विविध बॅ्रण्डचा मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा विक्रीसाठी साठविलेला आढळून आला. या मालाची किंमत जवळपास १२ लाख रुपये असून तो जप्त करण्यात आला. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त (अन्न) नरसिंह वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अभय देशपांडे, संजय बोयेवार, अखिलेश राऊत आणि प्रवीण उमप यांनी केली. डम्पिंग यार्डमध्ये नष्टहा माल जनतेच्या आरोग्यास घातक असल्याने आणि बाजारात पुनर्विक्री होऊ नये तसेच सेवन केल्यास जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याच्या दृष्टीने हा साठा चार ट्रकमध्ये भरून भांडेवाडी, डम्पिंग यार्डमध्ये नेऊन नष्ट करण्यात आला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, योगेश ग्वालानी हे मुदतबाह्य असलेल्या अन्नपदार्थांच्या पॅकेटवरील उत्पादन तिथी थिनर या रसायनाने पुसून नवीन उत्पादन तिथी नमूद करून बाजारात पुनर्विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. धाडीदरम्यान थिनर, इंक आणि दोन खोल्यांमध्ये मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा आढळला. धाड टाकली त्यावेळी पॅकेटवर अद्ययावत उत्पादन तिथी नमूद करण्याची प्रक्रिया सुरू होती. मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा क्रश करून त्याची पावडर करण्याचे अधिकार कंपनीच्या अधिकृत ‘सी अ‍ॅण्ड एफ’ला आहेत. ही पावडर अखाद्य असते, पण पशुखाद्य म्हणून विक्री करता येते. यासाठी कंपनी अधिकृत एजंटांची नियुक्ती करते. कंपनीचा अशा कोणत्याही प्रकारचा परवाना योगेश ग्वालानीकडे नव्हता. त्यानंतरही तो जनतेच्या आरोग्याला घातक असलेला माल बाजारात विक्री करण्याचे कृत्य करीत होता. योगेशविरुद्ध पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल नोंदविला असून, याप्रकरणी अधिकारी चौकशी करीत आहेत. (प्रतिनिधी)