शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

फलक लावले तरच बिले निघणार

By admin | Updated: October 26, 2015 02:54 IST

जिल्हा परिषदेमार्फत कंत्राटरादारांच्या माध्यमातून विविध बांधकामे, विकासकामे केली जातात.

कंत्राटदारांना इशारा : जि.प. बांधकाम समितीचा निर्णय नागपूर : जिल्हा परिषदेमार्फत कंत्राटरादारांच्या माध्यमातून विविध बांधकामे, विकासकामे केली जातात. बरेचदा कामे पूर्ण होत नसतानाही कंत्राटदार बिले उचलत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यापुढे कंत्राटदारांनी बांधकाम पूर्ण झाल्याचा फलक लावणे गरजेचे आहे. फलक न दिसल्यास बिले काढली जाणार नसल्याचा निर्णय जि.प.च्या बांधकाम समितीच्या बैठकीत घेण्यात आला. कामे पूर्ण झाली नसतानाही कंत्राटदार बिले उचलतात यासंदर्भात समितीचे सदस्य कमलाकर मेंघर यांनी बैठकीत प्रश्न उपस्थित केला होता. जी बांधकामे पूर्ण झाली त्या बांधकामाशेजारी माहितीदर्शक फलक लावला जात नाही. परिणामी, काम कोणत्या फंडातील आहे, कोणत्या वर्षातील आहे, कामाचे स्वरूप काय, किती वेळात पूर्ण करायचे होते, याविषयी कोणतीही माहिती नसते. त्यामुळे माहिती फलक लावण्याची सूचना कंत्राटदारांना करावी, अशी मागणी मेंघर यांनी केली. यावर बांधकाम झाल्यानंतर फलक लावणे अनिवार्य असून, फलकाचा फोटो पाहिल्यानंतरच कंत्राटदारांची बिले काढली जातील, असा निर्णय सभेत घेण्यात आला. करारानंतरही ग्रा.पं.कडून बांधकामाची निविदा काढली जाते, याकडेही लक्ष वेधण्यात आले. जि. प. स्तरावरील कामांना ग्रा.पं. करण्यास सक्षम आहे, अशी सहमती दर्शविल्यानंतरच ग्रा.पं. सोबत करारनामा करण्यात येतो. एकदा ग्रा.पं. सोबत करारनामा झाल्यानंतर परत त्याच कामाची ग्रा.पं. ने निविदा काढणे ही बाब कराराच्या विरुद्ध आहे. त्यामुळे ग्रा.पं. ने एकाच कामाची निविदा पुन्हा काढू नये, अशा सूचना ग्रामपंचायतींना दिल्या जाणार असल्याचे समितीचे अध्यक्ष शरद डोणेकर यांनी सांगितले. बैठकीला सदस्य चंद्रशेखर चिखले, नंदा नारनवरे, सुरेंद्र शेंडे, शांताराम मडावी, कमलाकर मेंघर, आदी उपस्थित होते.