शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

बाहुला-बाहुलीच्या लग्नात चिमुकल्यांची धम्माल

By admin | Updated: May 19, 2016 02:48 IST

लग्न म्हणजे आनंद, उत्साह आणि मौज मस्तीची नुसती धमालच. दीनदयाल शोध संस्थानच्या बालजगततर्फे

बालजगतचे आयोजन : चिमुकल्यांसह पालकही आनंदसोहळ्यात सहभागीनागपूर : लग्न म्हणजे आनंद, उत्साह आणि मौज मस्तीची नुसती धमालच. दीनदयाल शोध संस्थानच्या बालजगततर्फे लक्ष्मीनगर येथे बुधवारी अशाच एका खास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. अर्थातच हा विवाह सोहळा होता पण चिमुकल्यांच्या बाहुला - बाहुलीचा. बालरंजन यांचा मुलगा आणि शिशुरंजन यांची कन्या यांचा हा विवाह होता. त्यांच्या या विवाहाला तमाम बच्चे कंपनी, पालक आणि मुलांच्या भावविश्वातील लाडके सवंगडी डोरेमन, शिनचॅन, नोबिता, छोटा भीम, निन्जा हातोडी, माईटी रोजू, जॉगी, स्पायडरमॅन, बॅटमॅन, आर्यन मॅन, हॉरेल्ड हेंड्री, कॅप्टन अमेरिका, ब्लॅक पॅँथर, मोटू पतलू, हनुमान यांच्या वेशात होते. सारेच वऱ्हाडी नटूनथटून असल्याने वातावरणात रंगीबेरंगी माहोल होता. स्व. नानाजी जोग संस्थापित आणि थोर समाजसेविका स्व. सुमतीताई सुकळीकर यांनी खास बालकांच्या सर्वांगीण विकासाकरिता मनोरंजनासह कार्यान्वित केलेल्या या संस्थेचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यांच्या प्रेरणेतूनच जगदीश सुकळीकर आणि सदस्यांनी हे कार्य अखंडपणे सुरू ठेवले आहे. बालकांसाठी राबविल्या जाणाऱ्या अनेक कल्पक योजनांसह दरवर्षी या ठिकाणी साजरा होणारा बाहुला-बाहुलीचा विवाह सोहळा हा सगळ्यांच्याच खास आवडीचा विषय झाला आहे. बुधवारी गोरज मुहूर्तावर हा विवाह सोहळा थाटात पार पडला. चमकत्या पताकांनी सजविलेला लग्नमंडप, रांगोळ्यांचे सुशोभन, आकर्षक रुखवंतांची सजावट, मंगलाष्टकांचा निनाद, वऱ्हाड्यांची भरगच्च उपस्थिती आणि शुभमंगल सावधान. पारंपरिक पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. या लग्नातही हळदीचा कार्यक्रम, संगीताचे स्वर, सजवलेल्या बाबागाडीत नवरा-नवरीची दिमाखदार वरात आदी सारेच मुलांनी एन्जॉय केले. चॉकलेट, बिस्किट आणि खाऊचा अहेरही देण्यात आला. आजच्या बदलत्या वातावरणात बालकांच्या मानसिकतेला जपणाऱ्या या आनंदसोहळ्याचे आयोजन संस्थेचे सचिव जगदीश सुकळीकर, अध्यक्ष प्रभाकरराव मुंडले, नम्रता पिंपळखुटे, सुवर्णा भाके, पल्लवी देशपांडे यांनी केले. नृत्य करीत, मस्ती करीत आणि गीतांचे गायन करीत लहान मुलांनी हा विवाह सोहळा आनंदात साजरा केला, पण यात त्यांचे पालकही गुंतले होते. (प्रतिनिधी)