शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाच्या अंमलबजावणीसाठी भिक्खूंचा पुढाकार

By admin | Updated: December 28, 2014 00:36 IST

भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. संविधानात सर्व धर्मांना समान न्यायाची तरतूद आहे. परंतु अलीकडे धर्माच्या नावावर अल्पसंख्यक समुदायाला घाबरविण्याचे षड्यंत्र सुरू आहे.

नागपूर : भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. संविधानात सर्व धर्मांना समान न्यायाची तरतूद आहे. परंतु अलीकडे धर्माच्या नावावर अल्पसंख्यक समुदायाला घाबरविण्याचे षड्यंत्र सुरू आहे. हे देशासाठी घातक असून देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न आहे. तेव्हा देशाला अखंड ठेवण्याच्या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष भदंत आनंद महास्थवीर यांनी येथे व्यक्त केले. संविधानाच्या अंमलबजावणीसाठी बौद्ध भिक्खूंनी पुढाकार घेतला असून त्यासाठी नागपुरातील बुद्धनगरी येथे दोन दिवसीय राष्ट्रीय भिक्खू संमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सुद्धा त्यांनी पत्रपरिषदेत दिली. याबाबत अधिक माहिती देताना भदंत आनंद यांनी सांगितले की, अखिल भारतीय बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती, वंदना संघ आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही यांच्या संयुक्त विद्यमाने २५ व २६ जानेवारी रोजी नागपुरातील बुद्धनगरी येथे राष्ट्रीय भिक्खू संमेलन आयोजित करण्यात आले आहे. भारतीय संविधानाने दिलेल्या व्यक्ती स्वातंत्र्याचा, धर्म उपासना, श्रद्धा यांच्या स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेण्याचे षड्यंत्र सध्या देशात सुरू झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहेत. धर्मांतरविरोधी कायदा आणणे हा त्यातीलच एक प्रकार आहे. धर्मांतरविरोधी कायदा हा संविधानाचे उल्लंघन करण्याचाच प्रयत्न आहे. त्याला केंद्र सरकारकडूनही बळ मिळणे, हे एकूणच देशासाठी घातक आहे. नागपुरात होणाऱ्या दोन दिवसीय संमेलनात देशभरातून भिक्खू सहभागी होतील. त्यात यावर सविस्तर चर्चा केली जाईल. तसेच देशभरातील बौद्धांच्या संघटनांची मोट बांधण्याचा यातून प्रयत्न केला जाईल. यानतर बौद्ध भिक्खू देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन संविधानाच्या अंमलबजवणीसाठी प्रचार प्रसार करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला भदंत प्रज्ञाशील थेरो, भदंत सत्यानंद महाथेरो, भदंत धम्मनाग, भदंत हर्षबोधी, लॉर्ड बुद्धा टीव्हीचे संचालक भय्याजी खैरकर, सचिन मून, प्रा. देवदास घोडेस्वार, एस.एस. चंद्रिकापुरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)