शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
6
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
7
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
8
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
9
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
10
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
11
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
12
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
13
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
14
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
15
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
16
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
17
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
18
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
19
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
20
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल

भूमिपुत्र राजदीप ‘नेट’ मध्ये देशातून दुसरा

By admin | Updated: March 31, 2015 02:18 IST

समाजात काही माणसे अशी असतात की ज्यांना शून्यातून स्वत:चे अस्तित्व घडवावे लागते. परिस्थिती कितीही

‘एमस्सी’मध्ये घेतले होते चार सुवर्णपदक : खडतर परिस्थितीवर केली मातनागपूर : समाजात काही माणसे अशी असतात की ज्यांना शून्यातून स्वत:चे अस्तित्व घडवावे लागते. परिस्थिती कितीही विपरीत असली तरी परिश्रमानेच यश मिळते हे यशाचे सूत्र ठेवून ते जेव्हा मार्गक्रमण करतात तेव्हा त्यांच्या डोळ््यातील स्वप्ने आणखी मोठी होतात. अखेर त्याच्या कर्तृत्वानेच त्याची जगाला ओळख होते. जमिनीशी प्रेमळ संवाद साधणाऱ्या एका शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या राजदीप देवीदास उताणे याने हीच गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे. खेडेगावातून आलेल्या राजदीपने ‘सीएसआयआर-यूजीसी’तर्फे (कॉन्सिल आॅफ सायन्टिफिक अ‍ॅन्ड इंडस्ट्रीअल रिसर्च-युनिव्हर्सिटी ग्रॅन्ड कमिशन) आयोजित ‘नेट’च्या परीक्षेत देशपातळीवर दुसरे स्थान पटकाविले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०१ व्या दीक्षांत समारंभातदेखील त्याने चार सुवर्णपदके पटकावली होती हे विशेष. आपल्या कर्तृत्वाने त्याने हजारो विद्यार्थ्यांसमोर प्रेरणा निर्माण केली आहे.‘सीएसआयआर-युजीसी’तर्फे डिसेंबर २०१४ मध्ये प्राध्यापकपदाच्या पात्रतेसाठी ‘नेट’ची परीक्षा घेण्यात आली होती. यात राजदीप केवळ उत्तीर्णच झाला नाही तर त्याने देशपातळीवर दुसरा क्रमांक मिळविण्यात यश मिळविले.खेड्यातून सुरू झाला प्रवासशासकीय विज्ञान संस्थेतून रसायनशास्त्र विषयात ‘एमएसस्सी’ करणाऱ्या राजदीपचे वडील हे शेतकरी असून यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंत तालुक्यातील आजंती येथे त्यांची शेती आहे. घरची परिस्थिती फारशी चांगली नसल्याने राजदीपला सुरुवातीपासूनच संघर्षाचा सामना करावा लागला. पदव्युत्तर शिक्षणासाठी राजदीपने नागपूर गाठले व शासकीय विज्ञान संस्थेत प्रवेश मिळवला. संस्थेच्या वसतीगृहात शिकत असताना दिवसातून दहा ते बारा तास अभ्यास करून त्याने ‘एमएस्सी’ रसायनशास्त्रासारख्या अवघड विषयाच्या परीक्षेत विद्यापीठातून सर्वात जास्त गुण प्राप्त केले़ फेब्रुवारी महिन्यात झालेल्या १०१ व्या दीक्षांत समारंभात त्याचा चार सुवर्णपदकांनी सन्मान करण्यात आला. राजदीप सध्या रसायनशास्त्रातच संशोधन करत आहे. प्रा. डॉ. सुजाता देव यांच्या मार्गदर्शनात ‘अ‍ॅन्टी कॅन्सर ड्रग’ व ‘अ‍ॅन्टी एचआयव्ही ड्रग’ या विषयावर त्याचे संशोधन सुरू आहे. (प्रतिनिधी)भाऊ ठरला आधारस्तंभराजदीपच्या या यशात त्याचा भाऊ अमरदीप याचा मोलाचा वाटा आहे. उच्च शिक्षणासाठी नागपुरात येण्याची राजदीपची इच्छा होती परंतु परिस्थितीअभावी हे अशक्य होते. मोठ्या शहरात राहण्याचा खर्च आपल्याला झेपणारा नाही हे त्याला माहीत होते़ आपल्या भावाची हुशारी पाहून अमरदीपने त्याच्या शिक्षणासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला व आॅटो चालवून त्याच्या शिक्षणासाठी पैसा पुरविला. रसायनशास्त्रातील ‘बेसिक’ चांगले असल्यामुळे ‘नेट’साठी मी स्वअभ्यासावरच भर दिला. शिवाय डॉ.सुजाता देव व डॉ.फरहीन इनाम खान या शिक्षकांचेदेखील चांगले सहकार्य लाभले. माझे संशोधनकार्य पुढेदेखील सुरूच राहिल असे मत राजदीपने यावेळी व्यक्त केले.