शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल योजनेत मजूरीच्या अनुदानापासून लाभार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST

नागपूर : काटोल तालुक्यातील रेखा सुरेश ठाकरे या महिलेला २०२० मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकूल मंजूर झाले होते. पंचायत ...

नागपूर : काटोल तालुक्यातील रेखा सुरेश ठाकरे या महिलेला २०२० मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकूल मंजूर झाले होते. पंचायत समितीतून बांधकामासाठी महिलेला पहिला हप्ता व दुसरा हप्ता मिळाला. पण मनरेगातून मजुरीसाठी मिळणारे अनुदान मिळाले नाही. मनरेगाच्या सेलने या महिलेच्या प्रकरणात तिचा वर्क कोड वापरून मजुरीचे पैसे इतरांना दिल्याची माहिती पुढे आली आहे. हा प्रकार केवळ या महिलेच्या बाबतीतच घडला नाही, तर मनरेगातून मिळणाऱ्या मजुरीच्या अनुदानाची असे अनेक प्रकरणे ग्रामीण भागातून पुढे येत आहे.

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात हजारो घरकूल मंजूर झालेली आहे. घरकूल बांधण्यासाठी लाभार्थ्याला ४ आठवड्यात १ लाख २० हजार रुपये दिले जातात तर मनरेगातून घरकूल लाभार्थ्यास बांधकाम मजुरीचे १८ ते २१ हजार रुपये ४ हप्त्यात दिले जातात. लाभार्थ्यास बांधकामाचे १ लाख २० हजार रुपयांचे हप्ते मिळतात. मात्र मनरेगातून मजुरीचे हप्ते मिळत नाही. बांधकामाच्या पहिल्या हप्त्याची १५ हजाराची रक्कम लाभार्थ्याला मिळते, त्याचबरोबर मजुरीचे ५६०० रुपये सुद्धा मिळणे गरजेचे आहे. पण मजुरीच्या पहिल्या हप्त्याची रक्कम अदा केली नाही आणि बांधकामाचा दुसऱ्या हप्त्याचा ४० हजाराचा चेक लाभार्थ्याच्या खात्यात जमा झाल्यास, लाभार्थ्यास मजुरीचा हप्ता देण्यात येत नाही. पुढे अशीच प्रक्रिया सुरू राहते आणि चार टप्प्यात मिळणाऱ्या मजुरीच्या निधीपासून वंचित रहावे लागते. लाभार्थी पंचायत समितीच्या चकरा मारतात, मनरेगा सेलकडून त्यांना तांत्रिक अडचणी सांगून लाभापासून वंचित ठेवण्यात येते. मजुरीच्या तुलनेत बांधकामाचा निधी जास्त असल्याने लाभार्थीही मजुरीकडे दुर्लक्ष करतात.

त्याचाच फायदा घेऊन लाभार्थ्याचा वर्क कोड वापरून दुसऱ्या लाभार्थ्यास मजुरीचा लाभ दिला जातो. खरा लाभार्थी मजुरीच्या अनुदानापासून वंचित राहतो. ग्रामीण भागात घरकूल योजनेची मजुरी लाटण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे अध्यक्ष डॉ. अनिल ठाकरे यांनी केला आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

- मनरेगा सेल कर्मचारी जबाबदार

लाभार्थ्याला घरकूल बांधकामाचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर, दुसरा हप्ता मिळण्यासाठी ते पंचायत समितीतील बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांना आमिष दाखवून लगेच दुसऱ्या हप्त्याचा चेक मिळवून घेतात. बांधकामाचा दुसरा हप्ता मिळाल्यास मनरेगाच्या मजुरीचा पहिला हप्ता मिळत नाही. मजुरीचा निधी कमी असल्याने लाभार्थ्याचेही त्याकडे लक्ष नसते. मनरेगा सेलकडून एकदोन वेळा टाळाटाळ केल्यानंतर लाभार्थी पुन्हा कार्यालयात येत नाही. त्याचाच फायदा मनरेगा सेलचे कर्मचारी घेतात.