शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

प्रयोगशील व्हा, ब्रँडिंग करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 01:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात कौशल्य म्हणजेच हुनरची कमी नाही.परंतु या हुनरसोबतच बाजारात कोणत्या वस्तूला मागणी आहे, हे महत्त्वाचे आहे. वस्तूचा दर्जा आणि मार्केटिंगसोबतच त्याची ब्रँडिंगही करा. नवनवीन तंत्रज्ञान शोधणे आणि त्यात संशोधन करून नवीन वस्तू निर्माण करणे आवश्यक आहे. अशा वस्तूंना जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे, त्याची किंमत द्यायलाही ...

ठळक मुद्देनितीन गडकरी : हुनर खोज संवाद यात्रेचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात कौशल्य म्हणजेच हुनरची कमी नाही.परंतु या हुनरसोबतच बाजारात कोणत्या वस्तूला मागणी आहे, हे महत्त्वाचे आहे. वस्तूचा दर्जा आणि मार्केटिंगसोबतच त्याची ब्रँडिंगही करा. नवनवीन तंत्रज्ञान शोधणे आणि त्यात संशोधन करून नवीन वस्तू निर्माण करणे आवश्यक आहे. अशा वस्तूंना जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे, त्याची किंमत द्यायलाही लोकं तयार आहेत. तेव्हा कारागिरांनी प्रयोगशील व्हावे, वस्तूची ब्रँडिंग करावी. यासाठी इनोव्हेशन, टेक्नोलॉजी आणि रिसर्चवर भर द्यावा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.ग्राम ज्ञानपीठ, संपूर्ण बांबू केंद्र, राष्ट्रीय कारीगर पंचायत आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात तीन दिवसीय ‘हुनर खोज यात्रा संवाद व प्रस्तुतिकरण’ आयोजित करण्यात आले होते. रविवारी या कार्यक्रमाच्या समारोपीय समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, डॉ. महेश शर्मा, प्रभाकरराव मुंडले, सुनील देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी करागिरांच्या पाठीशी शासन नेहमीच खंबीरपणे उभे आहे. यासाठीच केंद्र सरकारने कौशल्य विकासासारखे स्वतंत्र मंत्रालयसुद्धा तयार केले असल्याचे स्पष्ट केले. यावेळी डॉ. महेश शर्मा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी देशभरातून आलेल्या विविध कारागिरांचा सन्मान करण्यात आला. किस्टू खडगी, हरिकृष्ण नायक, भय्यालाल शिवारे, रमेश बेहरे, संग्राम भिनारे या कारागिरांना सन्मानित करणयात आले. संचालन श्रद्धा श्रुुत्री यांनी केले. रामकुमार यांनी आभार मानले.कारागिरांसाठी स्वतंत्र मंत्रालय करासुनील देशपांडे यांनी आपल्या प्रास्ताविकेत देशभरातील कारागिरांच्या समस्या विशद केल्या. स्मार्ट शहरात या कारागिरांचे स्थान काय, असा प्रश्न उपस्थित करीत कारागिरांसाठी स्वतंत्र मंत्रालय किंवा आयोग स्थापन करण्यात यावा, अशी मागणी केली.बांबू लवकरच देशभरात टीपीमुक्तआम्ही महाराष्ट्रात बांबू टीपी(ट्रान्सपोर्टेशन पास)मुक्त केला आहे. लवकरच देशभरातही बांबू टीपीमुक्त केला जाईल. राष्ट्रीय बांबूधोरणही लवकरच जाहीर केले जाईल, असे नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.