शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी रिटर्न्स भरताना सावध राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 01:27 IST

प्रारंभीच्या टप्प्यात जीएसटी कायद्यातील तरतुदी आणि पद्धती सदस्य आणि डीलर्सला समजून घेण्याची गरज आहे. फॉर्ममध्ये आवश्यक असलेली माहिती आणि अंमलबजावणी करण्याच्या पद्धती जाणून घेणे एक आव्हानात्मक काम आहे.

ठळक मुद्देरितेश मेहता यांचे आवाहन : नागपूर सीए संस्थेतर्फे चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रारंभीच्या टप्प्यात जीएसटी कायद्यातील तरतुदी आणि पद्धती सदस्य आणि डीलर्सला समजून घेण्याची गरज आहे. फॉर्ममध्ये आवश्यक असलेली माहिती आणि अंमलबजावणी करण्याच्या पद्धती जाणून घेणे एक आव्हानात्मक काम आहे. कायद्यात सुधारणा किंवा फेरबदलासाठी मर्यादित संधी उपलब्ध असल्यामुळे सीएंनी जीएसटी रिटर्न्स सावधतेने भरावे, असे आवाहन सीए रितेश मेहता यांनी येथे केले.वस्तू व सेवा करातील तरतुदी आणि विभिन्न पद्धतीची माहिती करून देण्यासाठी आयसीएआयच्या नागपूर शाखेतर्फे धंतोली येथील सभागृहात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी सीए नागपूर शाखेचे अध्यक्ष संदीप जोतवानी, आयसीएआयच्या पश्चिम विभागाचे सदस्य सीए अभिजित केळकर, सीए जितेन सागलानी आणि सीए ओमप्रकाश अग्रवाल उपस्थित होते.रितेश मेहता यांनी जीएसटी रिटर्न भरण्याच्या जीएसटी-१, आर-२, आर-३ आणि ३ बी अशा विविध विषयांवर माहिती दिली. मेहता म्हणाले, जीएसटी-३ बी फॉर्म हा सारांश स्वरूपात असून त्यात बाह्य आणि आतील पुरवठ्याचे एकत्रित तपशील नमूद करणे आवश्यक आहे. जीएसटी अंतर्गत इनपुट टॅक्स क्रेडिट जीएसटी नियमानुसार निर्धारित पद्धतीने बाह्य कर देयताविरूद्ध पद्धतशीर समायोजित करणे आवश्यक आहे. जीएसटी रिटर्न्स भरताना त्यांनी विविध तांत्रिक अडथळ्यांवर प्रकाश टाकला.संदीप जोतवानी म्हणाले, जीएसटी कायद्यातील तरतुदी अत्यंत सोईच्या असल्यामुळे डीलर्स कायद्याचा अवलंब करेल. जीएसटी रिटर्न भरणे सोपे नसून त्यासाठी कायद्याचा अनुभव व ज्ञान असणे आवश्यक आहे. ओमप्रकाश अग्रवाल म्हणाले, सीएंना जीएसटी आर १, आर २ आणि आर ३ भरताना अडचणी येत आहेत. जीएसटी रिटर्न भरण्याची मुदत अनेकदा वाढविल्यामुळे सर्वांमध्ये संभ्रम आहे. पुढे सीएंसमोर सर्व प्रकारातील अनेक आव्हाने उभी राहणार आहे. वेळेवर रिटर्न भरण्यासाठी व्यापाºयांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे. जितेन सागलानी यांनी समन्वयन केले. यावेळी सीए सतीश सारडा, जय पोपटानी, सतीश लद्धड आणि सीए मोठ्या संख्येने उपस्थित होते.