शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘बीएस्सी’च्या विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा!

By admin | Updated: July 22, 2015 03:26 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील २ ते ३ हजार बीएसस्सीच्या (जुना अभ्यासक्रम) विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

नागपूर विद्यापीठ : दुसऱ्या वर्षातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अंतिम वर्षात मिळणार प्रवेशनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील २ ते ३ हजार बीएसस्सीच्या (जुना अभ्यासक्रम) विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. दुसऱ्या वर्षातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अंतिम वर्षात प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. ‘बीएसस्सी’ला सत्र प्रणाली लागू करण्यात आली आहे. परंतु जुन्या अभ्यासक्रमातील अनेक विद्यार्थ्यांचे दुसऱ्या वर्षाचे काही विषय निघाले होते. नियमांनुसार ते ‘एटीकेटी’च्या माध्यमातून तृतीय वर्षाच्या सत्रात प्रवेश घेण्यासाठी पात्र आहेत. परंतु ‘बीएसस्सी’ला सत्र प्रणाली लागू करताना विद्यापीठाने काढलेल्या एका ‘अध्यादेशानुसार असे विद्यार्थी प्रवेश घेण्यास पात्र नाहीत. सत्र प्रणालीनुसार तृतीय सत्रात अनुत्तीर्ण विद्यार्थ्याला पाचव्या सत्रात प्रवेश देणे शक्य नाही. त्यामुळे महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तसेच विद्यार्थ्यांनी यासंदर्भात विद्यापीठावर धडक दिली होती व प्र-कुलगुरूंसमोर हा मुद्दा मांडण्यात अला होता. विद्यार्थ्यांची बाजू योग्य असून याबाबत अभ्यास मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यांच्या प्रवेशासंदर्भात बुधवारी अध्यादेश जारी करण्यात येईल, असे प्र-कुलगुरूंनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)अटींचे पालन करण्याचे ‘एमकेसीएल’ला निर्देशदरम्यान,नागपूर विद्यापीठात प्रवेशाची नोंदणी होताक्षणीच विद्यार्थ्यांना ‘एसएमएस’ प्राप्त होणार आहे. विद्यार्थ्यांना ‘ई-सुविधेचे सर्व फायदे मिळाले पाहिजेत व काटेकोरपणे सामंजस्य करारातील अटींचे पालन झाले पाहिजे, असे विद्यापीठ प्रशासनाने ‘एमकेसीएल’ला बजावले आहे.देयकांवरुन वादात सापडलेले नागपूर विद्यापीठ व ‘एमकेसीएल’दरम्यानचा सामंजस्य करार कायम राहणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. परीक्षेच्या अगोदरची व नंतरची सर्व कामे ‘एमकेसीएल’कडे सोपविण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या नोंदणीपासून ते पदवी प्रमाणपत्र जारी करण्यापर्यंतच्या प्रक्रियांचा समावेश आहे. केवळ उत्तरपत्रिका ‘स्कॅनिंग’ व ‘आॅन स्क्रीन’ मूल्यांकनासाठी विद्यापीठाला बाहेरील एजन्सीची मदत घ्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना वेळोवेळी विद्यापीठातील घडामोडींची माहिती कळावी यासाठी ‘एसएमएस’ सुविधा ‘एमकेसीएल’कडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची नोंदणी झाली की लगेच त्यांना ‘एसएमएस’ जाणार आहे. सोबतच विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक, विविध सूचना, निकाल यांची माहितीदेखील विद्यार्थ्यांना घरबसल्या कळणार आहे.