शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

समता पाठोपाठ बार्टीचे विभागीय कार्यालयही बंद ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST

आनंद डेकाटे, नागपूर : समता प्रतिष्ठानच्या पाठोपाठ आता नागपुरातील बार्टीचे विभागीय कार्यालय सुद्धा बंद पडले आहे. सध्या हे कार्यालय ...

आनंद डेकाटे, नागपूर :

समता प्रतिष्ठानच्या पाठोपाठ आता नागपुरातील बार्टीचे विभागीय कार्यालय सुद्धा बंद पडले आहे. सध्या हे कार्यालय केवळ नावापुरतेच सुरू आहे. एका प्रभारी प्रकल्प अधिकाऱ्याच्या भरवशावर नागपुरातील विभागीय कार्यालय सुरू असल्याचा केवळ देखावा केला जात आहे. एकूणच नागपुरातील सामाजिक न्याय विभागाचा असलेला दबदबा नामशेष झाला आहे. याचा फटका नागपूर विभाग व एकूणच विदर्भातील मागासवर्गीयांवर होत आहे.

सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशाेधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टी ही एक स्वायत्त संस्था आहे. साामाजिक न्याय विभागांतर्गत असलेल्या विविध योजना मागासवर्गीयांपर्यंत पोहोचवण्यात आणि एकूणच मागासवर्गीयांच्या विकासात बार्टी या संस्थेचे मोठे योगदान राहिले आहे. नागपूर व विदर्भ या पट्ट्यात अनुसूचित जातीच्या लोकांची संख्या माेठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळेच दूरवरच्या लोकांपर्यंत याचा लाभ व्हावा म्हणून बार्टीचे विभागीय कार्यालय सुरू करण्यात आले. नागपुरात हे कार्यालय सुरू झाले. त्याचा लाभही मोठ्या प्रमाणात लोकांना भेटू लागला. भाजपच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले. याची स्थापना कंपनीच्या धर्तीवर करण्यात आली. नागपुरातच याचे मुख्यालय होते. या समता प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम राबविले गेले. विशेषत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राज्यभरात कार्यक्रम राबविले गेले; परंतु या कार्यक्रमांवर झालेल्या खर्चात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला. चौकशी झाली आणि समता प्रतिष्ठानचे सर्व अधिकारी कर्मचारी निलंबित करीत हे कार्यालय एकप्रकारे बंद करण्यात आले. समता प्रतिष्ठान बंद झाल्यानंतर आता येथील बार्टीचे कार्यालय सुद्धा बंद पडले आहे. केवळ नावालाच प्रशिक्षणाचे ऑनलाइन कार्यक्रम सुरू आहे.

बॉक्स

१२ पैकी एकही अधिकारी-कर्मचारी नाही

बार्टीच्या विभागीय कार्यालयात एकूण १२ अधिकारी-कर्मचारी कार्यरत होते. यासोबतच समता प्रतिष्ठानचे कर्मचारीही बार्टीची कामे सांभाळायचे. सध्या नागपूर जिल्ह्यातील समता दूत प्रकल्पाची जबाबदारी सांभाळणारे प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले यांच्याकडे विभागाचा अतिरिक्त कारभार साेपवण्यात आला आहे. मुळाच विभागीय कार्यालय बंदच पडले आहे. केवळ दाखविण्यापुरता कारभार पाहिला जात आहे.