शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

‘गंगाजमुना’तील बॅरिकेड्स उलथवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गंगाजमुनातील वारांगनांच्या देहविक्रयावर पोलिसांनी घातलेली बंदी आज स्वातंत्र्यदिनी आंदोलकांनी उलथवून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गंगाजमुनातील वारांगनांच्या देहविक्रयावर पोलिसांनी घातलेली बंदी आज स्वातंत्र्यदिनी आंदोलकांनी उलथवून टाकली. वेश्यावस्तीला पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स उलथवून तेथील टिनही फेकून दिले. विदर्भातील सर्वात मोठी वेश्यांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगाजमुनात वेश्याव्यवसाय बंद करण्यासाठी पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. चार दिवसांपूर्वी या वस्तीच्या आजूबाजूचे रस्ते पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बंद केले. काही ठिकाणी टिनही उभे केले. या वस्तीसाठी पोलिसांनी विशेषाधिकाराचा वापर करून कलम १४४ लागू केले. येथे येणाऱ्या ग्राहकांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला.

या कारवाईचा येथील वारांगनांसोबतच काही सामाजिक संघटनांनीही तीव्र विरोध केला आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक महिला नेत्या ज्वाला धोटे यांनी या कारवाईचा पहिल्या दिवसांपासूनच तीव्र विरोध चालवला आहे. वारांगनांचे आधी पुनर्वसन करा आणि नंतर त्यांना येथून हुसकावून लावा, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या जगण्याचा अधिकार हिरावून घेण्याचा अधिकार कुणालाही नसल्याचेही म्हटले होते. पोलिसांनी १४ ऑगस्टपर्यंत येथील बॅरिकेड्स काढले नाहीत तर १५ ऑगस्टला आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानुसार पोलिसांनी रविवारी सकाळपासूनच येथे मोठा बंदोबस्त लावला. मोठ्या प्रमाणात महिला पोलिसही नेमले होते. त्याला न जुमानता ज्वाला धोटे आपल्या कार्यकर्त्यांसह येथे पोहोचल्या. त्यांनी वारांगनांना एकत्रित करून कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स् हटविले. टिनही काढून टाकले. या घडामोडीमुळे गंगाजमुना परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच पोलीस उपायुक्त लोहित मतानी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जमावाची समजूत काढली. त्यानंतर वातावरण निवळले.

---

कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल

लकडगंज

पोलिसांनी या प्रकरणात रविवारी सायंकाळी आंदोलकांवर साथरोग प्रतिबंधक कायद्याचे कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला.