शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

‘बालसदन’चा श्वास कोंडतोय

By admin | Updated: December 6, 2015 03:13 IST

शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्यासाठी एकीकडे शासन प्रयत्न करीत आहे, मात्र दुसरीकडे अनाथ मुलांना शाळेचा आधार देणाऱ्या संस्थांचा श्वास रोखला जात आहे.

निशांत वानखेडें नागपूरशाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्यासाठी एकीकडे शासन प्रयत्न करीत आहे, मात्र दुसरीकडे अनाथ मुलांना शाळेचा आधार देणाऱ्या संस्थांचा श्वास रोखला जात आहे. बालसदनबाबत हाच प्रकार दिसून येत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून या संस्थेची रसदच रोखण्यात आली आहे. ही संस्था बंद करण्याचा घाट प्रशासनाने घातला असल्याचा आरोप संस्थेच्या सदस्यांनी लावला आहे. दुसरीकडे संस्था सदस्यांकडूनच अनधिकृत प्रकार सुरू असल्याचा ठपका ठेवत प्रशासनानेही आडमुठी भूमिका घेतली आहे. या वादामुळे बालसदन आणि सध्या येथे वास्तव्यास असलेल्या १३ मुलांचे भविष्यच अंधारात लोटल्या जाईल की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.विद्यार्थ्यांची रसद, कर्मचाऱ्यांचे पगार रोखले : १३ मुलांचा जीव टांगणीलाविदर्भ सहायता समितीकडून १९९० साली बालसदनची स्थापना करण्यात आली. तत्कालीन राज्यपालांनी काटोल रोडवरील राजभवनाची २.५ एकर जागा या बालसदनसाठी दिली. बालसदनला प्रशासकीय यंत्रणेची जोड मिळावी आणि कारभारावर नियंत्रण राहावे, यासाठी विदर्भ सहायता समितीवर पदसिद्ध अध्यक्ष म्हणून विभागीय आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर अनेक वर्षे बालसदनचा कारभार सुरळीत सुरू होता. यावर्षी तर बालसदनची अवस्था अतिशय दयनीय झाल्याचे चित्र आहे. विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार शासनाने गेल्या पाच महिन्यांपासून या बालगृहाची रसदच बंद केली आहे; सोबतच येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगारही बंद केले आहेत. सध्या बालगृहात १३ मुले व त्यांच्या व्यवस्थेसाठी ३ कर्मचारी कार्यरत आहेत. शासकीय रसद बंद झाल्याने मुलांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. दुसरीकडे पगार न मिळाल्यामुळे कर्मचारी हतबल झाले आहेत. समितीचे आजीवन सदस्य असलेल्या ज्ञानेश्वर रक्षक यांनी बालसदनच्या परिस्थितीसाठी विभागीय आयुक्त प्रशासनाला जबाबदार धरले आहे. प्रशासनाला या जागेवर दुसरीच इमारत उभी करायची आहे. त्यामुळे बालसदनला टाळे ठोकण्याचे षङ्यंत्र प्रशासन करीत असल्याचा आरोप रक्षक यांनी लावला. रक्षक यांनी सांगितले की, २०१३ साली तत्कालीन आयुक्त बी.व्ही. गोपाल रेड्डी यांनी बालसदन संस्था बंद करण्यात येणार असल्याचे सांगत मुलांना प्रवेश देणे बंद करा, असे निर्देश सदस्यांना दिले होते. मात्र ही सेवाभावी संस्था बंद होऊ नये म्हणून आम्ही एनजीओंच्या सहकार्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला. या दबावामुळे त्यांनी हा निर्णय मागे घेतल्याचे रक्षक म्हणाले. यानंतर आलेल्या आयुक्तांनीही हाच पवित्रा घेतला.