शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
7
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
8
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
9
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
10
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
11
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
12
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
13
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
14
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
15
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
18
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
19
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
20
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...

बजाज यांना शिक्षण विभागाचाही होता पाठिंबा

By admin | Updated: November 24, 2015 06:12 IST

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अडकलेल्या महात्मा गांधी सेंटेनियल हायस्कूल,जरीपटक्याचे दीपक बजाज यांना शिक्षण

नागपूर : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अडकलेल्या महात्मा गांधी सेंटेनियल हायस्कूल,जरीपटक्याचे दीपक बजाज यांना शिक्षण विभागाचेही पाठबळ असल्याचे उघडकीस आले आहे. दीपक बजाज यांच्या शाळेत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत आलेल्या धान्याची अफरातफर होत असताना, शालेय पोषण आहार अधिकारी नीलेश वाघमारे यांनी धाड टाक ली होती. परंतु शिक्षण विभागाने अशी कुठलीही धाड टाकली नसल्याचे माहितीच्या अधिकारात स्पष्ट केले आहे. या धाडीत जरीपटका पोलिसांचे सहकार्य घेण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी माहिती अधिकारात दिलेल्या माहितीत धाड टाकल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. बजाज यांच्या शाळेवर टाकलेल्या धाडीची साधी माहिती शिक्षण विभाग लपवून ठेवत असल्याने, शिक्षण विभागाचा संपूर्ण पाठिंबा बजाज यांना होता, हे लक्षात येते. १६ आॅगस्ट २०१५ रोजी महात्मा गांधी हायस्कूल,जरीपटका येथे शालेय पोषण आहार योजनेत येणारा तांदूळ बाहेर विकण्यात येत असल्याची माहिती शिक्षण विभागाला मिळाली होती. त्यानुसार सकाळी ११ वाजता शालेय पोषण आहार योजनेचे अधिकारी नीलेश वाघमारे यांनी जरीपटका पोलिसांच्या मदतीने शाळेत धाड टाकली. यावेळी शाळेच्या आवारात एक ट्रक, वजनकाटा व तांदूळ भरलेली पोती आढळून आली. परंतु शिक्षण विभागाने कुठलीही कारवाई केली नाही. यासंदर्भात प्रजासत्ताक शिक्षण कर्मचारी संघातर्फे शिक्षण विभागाला या धाडीसंदर्भात संपूर्ण अहवाल तसेच केलेल्या कारवाईचा तपशील माहितीच्या अधिकारात मागितला. जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी यांनी दिलेल्या माहितीत सदर शाळेत कोणत्याही प्रकारची धाड टाकण्यात आलेली नाही, असे स्पष्ट केले. हीच माहिती संघटनेने सहायक पोलीस आयुक्त पाचपावली यांना मागितली. पोलिसांनी दिलेल्या माहितीत महात्मा गांधी शाळेत अन्नधान्याची अफरातफर होत असल्यामुळे शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शिक्षण विभागातर्फे धाड टाकण्यात आली होती. जरीपटका पोलिसांचे या धाडीसाठी सहकार्य घेण्यात आले होते. ही धाड टाकण्यासाठी शिक्षण विभागातर्फे शालेय पोषण आहार योजनेचे अधिकारी नीलेश वाघमारे हे पोलीस स्टेशनला आले होते. त्यांच्या सूचनेवरून पोलीस उपनिरीक्षक एस. एल. वाकडे हे घटनास्थळी गेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीत असा स्पष्ट उल्लेख असतानाही, शिक्षण विभागाने ही कारवाई नाकारली होती. बजाज यांना वाचविण्यासाठी शालेय पोषण आहार अधिकारी व बजाज यांच्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाला असल्याचा आरोप प्रजासत्ताक संघटनेचे हेमंत गांजरे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)