शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांची उंची हिमालयाहून अधिक

By admin | Updated: September 4, 2014 00:56 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उंची हिमालयाहून अधिक व विचारांची खोली हिंद महासागरापेक्षा जास्त होती, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले.

न्यायमूर्ती भूषण गवई : ‘परिसस्पर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा’ पुस्तकाचे प्रकाशननागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उंची हिमालयाहून अधिक व विचारांची खोली हिंद महासागरापेक्षा जास्त होती, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले.मुंबई उच्च न्यायालयाचे माजी प्रबंधक दिवंगत भालचंद्र वराळे यांनी लिहिलेल्या ‘परिसस्पर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा’ पुस्तकाचे आज, बुधवारी न्या. गवई यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. चिटणवीस सेंटर येथे झालेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध साहित्यिक प्रा. महेश एलकुंचवार, पुस्तकातील प्रस्तावनेचे लेखक दत्ता भगत, एल. बी. रायमाने, नांदेड येथील संगत प्रकाशनचे जयप्रकाश सूरनार प्रमुख अतिथी होते. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शाह हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाही.बाबासाहेबांनी जवळपास सर्वच विषयांना हात घातलेला आहे. त्यांनी अस्पृश्यता व अत्याचार संपविण्यासाठी जीवनभर कार्य केले. राज्यघटनेच्या निर्मितीत त्यांचे अमूल्य योगदान आहे. असामान्य व्यक्तिमत्त्व असतानाही त्यांचे वागणे मात्र सामान्यांसारखेच होते, असे न्या. गवई यांनी सांगितले.पुस्तकावर समीक्षणात्मक बोलण्याचे टाळून एलकुंचवार म्हणाले, हे पुस्तक केवळ आठवणी नसून अवदान आहे. अवदान ही परंपरा मराठी वाङ्मयात जास्त वापरल्या गेलेली नाही. बरेच बुद्धकालीन वाङ्मय नाहिसे झालेले आहे. आपण एवढे करंटे आहोत की प्राचीन परंपरा नष्ट होऊ देतो. बुद्धकालीन वाङ्मय अभ्यासक्रमात नाही हा चिंतेचा विषय आहे. प्राचीन परंपरा विसरणारा समाज कधीच पुढे जाऊ शकत नाही. आपले ज्ञान विक्रेय आहे. मूलभूत ज्ञान व कलेच्या ठिकाणी जाती आपोआप गळून पडतात. विपषणा हा आत्मशुद्धीचा भाग असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील वाद संपत्तीसाठी नव्हता. माणसांना सबुद्ध करण्यासंदर्भात त्यांच्यात मतभेद होते, याकडे भगत यांनी लक्ष वेधले. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी प्रास्ताविक केले. सूरनार, रायमाने, भगत व मनोहर झिलटे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात विधी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येत उपस्थित होते.(प्रतिनिधी)