शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्र उभारणीत बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा!

By admin | Updated: April 10, 2017 02:00 IST

काजव्याचा प्रकाश तोपर्यंतच असतो जोपर्यंत सूर्य उगवत नाही. याप्रमाणेच डॉ. बाबासाहेबांच्या विद्वत्तेपुढे आपला टिकाव लागणार नाही.

सुनील कदम : पुसद येथे धम्मक्रांती प्रज्ञापर्वातील द्वितीय प्रबोधन पुष्पपुसद : काजव्याचा प्रकाश तोपर्यंतच असतो जोपर्यंत सूर्य उगवत नाही. याप्रमाणेच डॉ. बाबासाहेबांच्या विद्वत्तेपुढे आपला टिकाव लागणार नाही. म्हणून त्यांना जाती किंवा विशिष्ट लोकांचे उद्धारकर्ते म्हणून चाकोरित बांधण्याचा प्रयत्न येथील विद्वान म्हणविणाऱ्यांनी केला. तसेच बाबासाहेबांनी केलेल्या कामाचे श्रेय स्वत: लाटून घेण्याचा प्रकारच हे सिद्ध करतो की भारताच्या उभारणीत बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा होता, असे प्रतिपादन मुंबई येथील आंबेडकरवादी विचारवंत सुनील कदम यांनी केले. धम्मक्रांती प्रज्ञापर्वानिमित्त आयोजित प्रबोधनमालेत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्र उभारणीत योगदान’ या विषयावर ते दुसरे पुष्प गुंफत होते. सुरुवातीला आदर्शनगरच्या चिमुकल्यांनी ‘जय भीमवाल्यांची शान निळा झेंडा’ या गीतावर नृत्य, तर शिवाजी वॉर्ड येथील परिवर्तन बहुद्देशीय महिला मंडळाने सामूहिक बुद्ध वंदना सादर केली. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर भगत, मनोज बागुल, राजेंद्र कांबळे, यशवंत देशमुख, विश्वास भवरे, आर.डी. रणवीर, प्रज्ञापर्वचे अध्यक्ष मिलिंद हट्टेकर उपस्थित होते. वर्धा येथील सुधीर भगत यांनी ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या विषयावर विचार व्यक्त करताना पाली भाषेला अद्यापपर्यंत संविधानिक दर्जा न मिळाल्याची खंत व्यक्त केली. तर मुंबई येथील विचारवंत राजेंद्र कांबळे यांनी अनुसूचित जाती जमाती, ओबीसींची सद्यस्थिती या विषयावर बोलताना देशाच्या आर्थिक बजेटमध्ये आपल्याला न्याय मिळत नसल्याचे सांगत यासाठी आर्थिक विषयावर व्यापक लढा भीमसैनिकांनी उभारावा, असे आवाहन केले.संचालन भाऊ गवई यांनी, तर आभार दीपक मेश्राम यांनी मानले. सोमवार, १० एप्रिल रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनिस यांचे ‘राष्ट्रभक्त आंबेडकर आणि भारताचे भविष्य’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. (प्रतिनिधी)