शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

बाबांनी चहा विकला मी आयएएस होणार!

By admin | Updated: June 3, 2014 03:04 IST

त्या दाम्पत्याला दोन मुली. वंशाचा दिवा कोण वाढवणार?

९0.१५ टक्के गुण मिळविणार्‍या शुभांगीची जिद्द

सुनील चरपे नागपूर

त्या दाम्पत्याला दोन मुली. वंशाचा दिवा कोण वाढवणार? याची चिंता नाही. गरजही नाही. चहाची कॅन्टीन चालवून आपला उदरनिर्वाह करतात. घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. परंतु तरीही मुलींनी चांगले शिकावे, मोठय़ा हुद्याची नोकरी करावी, यासाठी त्यांचा आटापिटा. मुलीनेही बारावीच्या परीक्षेत ९0.१५ टक्के गुण घेऊन आपल्या आई-वडिलांच्या कष्टाला सार्थक केले. माझे आई-वडील चहा विकतात. या बळावरच त्यांनी मला शिकविले. आता त्यांचे ऋण फेडायची वेळ माझी आहे. मला आता आयएएस होऊन आपल्या पालकांना चांगले दिवस दाखवायचे आहेत. ही जिद्द आहे शुभांगी नारेकर या विद्यार्थिनीची.

शुभांगी सदर येथील जाईबाई चौधरी ज्ञानपीठ येथे कॉर्मस शाखेला होती. वडील दिलीप आणि आई मीराबाई हे सुरेंद्रगडसारख्या झोपडपट्टीत एका भाड्याच्या खोलीत राहतात. त्यांना शुभांगी आणि कोकिळा या दोन मुली. शुभांगी बारावीला होती. घरच्या परिस्थितीची तिला जाणीव आहे. त्यामुळे दोन खोलीचे घर. त्यात चार जीव. सुखी समाधानाने राहतात. आई-वडील आपल्यासाठी किती कष्ट घेतात, याची जाणीव दोन्ही मुलींना आहे. शुभांगी मोठी असल्याने ती जरा जास्त व शहाण्यासारखी वागते. आई-वडील दोघेही कामासाठी घराबाहेर असल्याने घरातील संपूर्ण कामे तीच करते. हे तिचे बारावीचे वर्ष असल्याने आई तिला फारसे काम करू देत नव्हती. तरी ती आपल्या अभ्यास सांभाळून आईला मदत करायचीच.

शिकवणी लावली नाही. शाळेत नियमित जाणे आणि शिक्षकांनी दिलेले होमवर्क करणे यावरच अधिक लक्ष केंद्रित केले. दहावीमध्ये ८२ टक्के गुण घेतल्याने आई-वडिलांचाही तिच्यावर फार विश्‍वास. आपली मुलगी नक्कीच नाव कमावणार, असे तिच्या आई-वडिलांना नेहमीच वाटायचे. हा विश्‍वास अखेर तिने सार्थ केला.

पालीमध्ये १00 पैकी १00

शुभांगी ही ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थिनी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तिचे आदर्श. ज्या ठिकाणी ती अभ्यास करते, तिथे तिने डॉ. आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांची मूर्ती ठेवली आहे. यातून आपल्याला प्रेरणा मिळत असल्याचे ती सांगते. या प्रेरणेतूनच पाली या विषयामध्ये शुभांगीने १00 पैकी १00 गुण घेतले आहे.