शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

अवनीला बेकायदेशीरपणे ठार मारण्यात आले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:12 IST

नागपूर : अर्थ ब्रिगेड फाउंडेशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करून अवनी (टी-१) वाघिणीला बेकायदेशीरपणे ठार ...

नागपूर : अर्थ ब्रिगेड फाउंडेशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करून अवनी (टी-१) वाघिणीला बेकायदेशीरपणे ठार मारण्यात आले, असा आरोप केला आहे.

अवनीला यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनपरिक्षेत्रामध्ये ठार मारण्यात आले आहे. त्यासाठी खासगी शिकाऱ्यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. अवनी नरभक्षक होती असा वनविभागाचा दावा आहे. यासंदर्भात अर्थ ब्रिगेड फाउंडेशनची जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य शोधून काढण्याची फाउंडेशनची मागणी आहे. त्यात फाउंडेशनने अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करून आणखी काही धक्कादायक मुद्द्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. हैदराबाद पोलीस आयुक्तांनी विशेष पथकातील शिकारी शफतअली खान व असगरअली खान यांच्याकडील शस्त्र परवान्याची माहिती दिली नाही. तसेच या दोघांच्या शस्त्र परवान्याच्या प्रती मिळण्यासाठी यवतमाळ पोलीस अधीक्षकांना मार्च-२०२१ मध्ये अर्ज सादर करण्यात आला आहे. परंतु त्यांनी अद्याप प्रती दिल्या नाही. त्यावरून या दोघांच्या शस्त्र परवान्याच्या प्रती कुणाकडेच नाही हे स्पष्ट होते. अवनीला ठार मारण्यापूर्वी शफतअली खान यांच्या गैरवर्तनाविषयी वनाधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. परंतु, पथकाकडील शस्त्रे, दारूगोळा व शस्त्र परवाने तपासण्याची तसदी कुणीच घेतली नाही. विशेष पथकात असगर अली खान यांचा समावेश करण्यात आल्याचे यवतमाळ पोलीस अधीक्षकांना कळविण्यात आले नव्हते. त्यावरून त्यांचा पथकात समावेश नव्हता हे सिद्ध होते. अवनी ही असगरअली खान यांनी झाडलेल्या बंदुकीच्या गोळीमुळेच मारली गेली. परंतु, सत्य लपवले जात आहे असे फाउंडेशनने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.