शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

ऑटोमोबाइल डीलर्सचे विक्री कर मूल्यांकन आदेशांना आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:07 IST

नागपूर : विदर्भ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन व १६ ऑटोमोबाइल डीलर्सनी विक्रीकर मूल्यांकन आदेशांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका ...

नागपूर : विदर्भ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन व १६ ऑटोमोबाइल डीलर्सनी विक्रीकर मूल्यांकन आदेशांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायालयाने राज्याच्या वित्तविभागाचे सचिव, विक्रीकर आयुक्त व विक्रीकर उपायुक्तांना नोटीस बजावून १६ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, तसेच वादग्रस्त आदेशांनुसार विक्रीकर वसुली केली गेल्यास ती या याचिकेवरील अंतिम निर्णयाधीन राहील, असे स्पष्ट केले आहे.

विक्री कर प्राधिकाऱ्यांनी १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीकरिता वाहनांच्या किमतीमध्ये आरटीओ कर, नोंदणी शुल्क व विमा हप्त्यांचा समावेश करून विक्री कराचे मूल्यांकन केले आहे, तसेच त्यानुसार ऑटोमोबाईल डीलर्सना विक्रीकर जमा करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यावर याचिकाकर्त्यांचा आक्षेप आहे. आरटीओ कर, नोंदणी शुल्क व विमा हप्ते वाहनाच्या किमतीचा भाग नसतात. ऑटोमोबाइल डीलर्स सदर शुल्क वाहनमालकाच्या वतीने आरटीओ कार्यालयात व विमा कंपनीकडे जमा करतात. आरटीओ नोंदणी व विमा पॉलिसी हे वाहन मालक व प्राधिकरणे यांच्यामधील वाहन विकल्यानंतरचे स्वतंत्र व्यवहार आहेत. या व्यवहारात ऑटोमोबाइल डीलर्स केवळ मध्यस्थ म्हणून कार्य करतात. त्यामुळे सदर शुल्कांचा वाहनाच्या विक्री किमतीत समावेश करणे अवैध आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. विविध तारखांना जारी वादग्रस्त विक्री कर मूल्यांकन आदेश व डिमांड नोटीस रद्द करण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. एच.व्ही. ठाकूर यांनी कामकाज पाहिले.