शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

शिवणगावातील प्रकल्पग्रस्तांचे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे लक्ष

By admin | Updated: March 20, 2016 03:16 IST

मिहान-सेझचा विकास करणारी शासनाची कंपनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) मिहानमधील कार्यालय ...

२७ मार्चला बैठक, विश्वास पाटील यांच्याशी चर्चा : वाढीव मोबदला व १२.५ टक्के जमीन द्यानागपूर : मिहान-सेझचा विकास करणारी शासनाची कंपनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) मिहानमधील कार्यालय दोन दिवस ताब्यात घेऊन ठिय्या आंदोलन करणाऱ्या शिवणगावातील प्रकल्प्रगस्तांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चेसाठी तयार झाले आहेत. २७ मार्चला होणाऱ्या चर्चेतून काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रकल्प्रगस्तांच्या ठिय्या आंदोलनापुढे नमते घेत मुख्यमंत्री व एमएडीसीचे अध्यक्ष फडणवीस आणि उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील चर्चेसाठी तयार झाले. त्यानुसार शनिवार, १९ ला दुपारी २.३० वाजता पाटील यांनी तब्बल दोन तास विविध मागण्यांवर प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. त्यांच्यानुसार मुख्यमंत्री २७ मार्चला प्रकल्प्रगस्तांची चर्चा करणार आहेत. मोबदला व विकास शुल्काविना १२.५ विकसित जमिनीची मागणीशिवणगावातील शेतकऱ्यांना लगतच्या जयताळा गावाप्रमाणेच एकरी ६० लाख रुपये मोबदला आणि कोणतेही विकास शुल्क न आकारता १२.५ टक्के विकसित जमीन देण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली.वाढीव मोबदल्यासाठी कोर्टात गेल्यानंतर तब्बल २२ वर्षे लागतात. त्यामुळे हा प्रश्न लोकअदालतमध्ये सोडवावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली. हा प्रश्न विश्वास पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलला. २७ मार्चच्या बैठकीत ते निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले. घरांच्या पुनर्वसनासाठी संयुक्त समितीशेतकरी, बिगर शेतकरी आणि अतिक्रमण अशी वर्गवारी करून शासन शिवणगावातील जवळपास ११६० रहिवाशांना चिचभुवन येथे अनुक्रमे तीन हजार, दीड हजार आणि हजार चौरस फूट विकसित प्लॉट देणार आहे. याशिवाय गजराज ६२ प्रकल्पग्रस्तांना शेतकरी वर्गवारीत ३ हजार चौ.फूट प्लॉट मिळेल. (प्रतिनिधी)