शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

कार चालकाच्या हत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:08 IST

एमआयडीसीत गुन्हा दाखल : आरोपी फरार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एमआयडीसीतील राजीवनगरात राहणाऱ्या एका वाहन चालकाची हत्या करण्याचा ...

एमआयडीसीत गुन्हा दाखल : आरोपी फरार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एमआयडीसीतील राजीवनगरात राहणाऱ्या एका वाहन चालकाची हत्या करण्याचा प्रयत्न झाला. आरोपींनी धारदार शस्त्राने गळ्यावर वार केल्यामुळे

सम्राट विजयसिंह हा ३३ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर काही जण बेपत्ता झाल्याने त्यांच्यावर संशयाची सुई वळली आहे.

राजीवनगर, झेंडा चौक येथील रहिवासी विजय विश्‍वनाथ सिंह (७२) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा सम्राट कार चालक आहे. २ मेच्या रात्री सम्राट त्याचा मित्र प्रदीप सिंह ऊर्फ बच्चा सिंहसोबत एका रूममध्ये झोपला होता. मध्यरात्रीनंतर काही अज्ञात आरोपींनी सम्राटवर शस्त्राने हल्ला चढवला. त्याच्या गळ्यावर वार करण्यात आल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती कळताच एमआयडीसीचे ठाणेदार युवराज हांडे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, जखमीला रुग्णालयात पाठविण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेपासून सम्राटचा मित्र बच्चा तसेच अन्य काही संशयित बेपत्ता झाले. त्यामुळे त्यांनी हा गुन्हा केला असावा, असा संशय आहे. या प्रकरणात हत्या करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

---