शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

‘इंडिगो’मध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली ठगबाजीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:10 IST

नागपूर : इंडिगो एअरलाइन्समध्ये कॅब चालकाची नोकरी देण्याच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला; मात्र संबंधित युवकाच्या सतर्कतेमुळे हा ...

नागपूर : इंडिगो एअरलाइन्समध्ये कॅब चालकाची नोकरी देण्याच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला; मात्र संबंधित युवकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार टळला.

उमेश नानोटकर असे या युवकाचे नाव असून दोन दिवसांपूर्वी त्यांना व्हॉट्सॲपवर इंडिगो एअरलाईन्समध्ये कॅब चालकाची नोकरी उपलब्ध असल्याची माहिती सोशल मीडियावरील जाहिरातीच्या माध्यमातून कळली होती. त्यांनी ऑनलाईन जाऊन अप्लाय केला असता व्हेरिफिकेशनसाठी ५५० रुपये भरावे लागले. त्यानंतर संबंधितांकडून ऑफर पत्र पाठवून नोकरीची आणि अनेक प्रकारच्या सवलतीची हमी देण्यात आली होती. प्रमोद शिव आणि अमित नामक व्यक्तींचे त्यांना कॉलही आले. शनिवार पुन्हा त्यांना व्हाॅट्सॲपवर एक पत्र पाठवून ड्रेस आणि सिक्युरिटी डिपॉझिटसाठी ४,५०० रुपये जमा करण्यास सुचविले. त्यामुळे त्यांना संशय आला. जवळच्या एका व्यक्तीकडून त्यांनी यासंदर्भात अधिक माहिती मिळविली असता, इंडिगोकडून अशी कसलीही जाहिरात निघाली नसल्याचे कळले. एवढेच नाही तर अनेकांकडून यासंदर्भात चौकशी सुरू असल्याचेही कळले. यावरून अनेकजण ठगविले गेले असल्याची शक्यता आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्याची तयारी नानोटकर यांनी दर्शविली आहे.

इंडिगो एअरलाइन्सच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, एअरलाइन्स आणि एअरपोर्टमध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार आता नेहमीचेच झाले आहेत. इंडिगो एअरलाइन्सची कार्यालयीन वेबसाईट गोइंडिगो डॉट इन आहे.

...

जॉयनिंगचीही दिली होती तारीख

जॉब ऑफर लेटरमध्ये २५,५०० रुपये दरमहा वेतन आणि अनेक सवलती देण्याचा उल्लेख होता. इंडिगो एचआर मॅनेजर या पदनामासह सुरेंद्र कुमार यांच्या सहीने हे पत्र पाठविल्याचे दिसत होते. २ सप्टेंबरला सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळात जॉयनिंग सांगितले होते. रक्कम जमा करण्यासाठी सुरेंद्र कुमार नावाने एका खासगी बँकेचा अकाउंट नंबर (०१४५८६४४३७) देण्यात आला होता. फोन पे, गुगल पे आणि पेटीएमचे क्रमांकही संबंधित व्यक्तीला व्हाॅट्सॲपवर पाठविण्यात आले होते.

...