शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

स्टंटबाजीवरून पुन्हा एकाच्या हत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:08 IST

सक्करदऱ्यात घडली घटना : तरुण गंभीर जखमी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वेगात दुचाकी चालविण्याच्या वादातून कोतवाली पोलीस ठाण्याच्या ...

सक्करदऱ्यात घडली घटना : तरुण गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वेगात दुचाकी चालविण्याच्या वादातून कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री थरारक हत्याकांड घडले. या प्रकरणाच्या वृत्ताची शाई सुकायची असतानाच सक्करदऱ्यात सोमवारी रात्री याच कारणावरून तिघांनी एकाच्या डोक्‍यात दगड मारून त्याला गंभीर जखमी केले. जहीर अहमद मोबिन अहमद असे जखमीचे नाव आहे. जहीर श्यामबाग, गवंडीपुरा येथे राहतो. सोमवारी रात्री १०.४५ वाजता तो त्याच्या मित्रासह सक्करदऱ्यातील ग्राउंडजवळ गप्पा करत होता. तेथे साई लांजेवार नामक आरोपी स्टंटबाजी करत जोरात दुचाकी चालवत होता. त्यामुळे गुंजन नामक तरुणाने त्याला हटकले. यावेळी आरोपी लांजेवारने गुंजनला मारहाण केली.

काही वेळानंतर तो दोन साथीदारांना घेऊन आला. या तिघांनी गुंजन आणि जहीरला शिवीगाळ करून त्यांच्यावर जोरदार दगडफेक केली. त्यामुळे जहीरच्या डोक्याला दगड लागून तो गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. माहिती कळताच सक्करदरा पोलीस घटनास्थळी पोहोचले. जहीरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोबीन अहमद यांच्या तक्रारीवरून आरोपी लांजेवार आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांचा शोध घेतला जात आहे.

---

कोतवालतील आरोपींना पीसीआर

स्टंटबाजी करण्याच्या वादातून निर्माण झालेल्या वैमनस्यातून सैफ अली उर्फ शाहरुख शौकत अली या २६ वर्षीय तरुणाची हत्या करणारे आरोपी बाबल्या उर्फ लक्ष्‍मण दशरथ हिवराळे, विनायक इसकापे आर. के. पटेल आणि बंटी जैस या चौघांना न्यायालयाने २९ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, कोतवाली पोलिसांनी आरोपींकडून शाहरुखची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली तलवार जप्त केली. आरोपींनी कट-कारस्थान करूनच शाहरूखची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. हे हत्याकांड बाजूच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, आरोपींविरुद्ध तो सबळ पुरावा ठरणार आहे.

---