शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

श्वानामुळे वाढलेल्या वादात बापलेकांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:07 IST

अनमोल यादवराव चाैधरी (वय २१) आणि आरोपी कालू शेख हे आजूबाजूला राहतात. कालू हा गुन्हेगारीवृत्तीचा आहे. त्यांच्यात गेल्या काही ...

अनमोल यादवराव चाैधरी (वय २१) आणि आरोपी कालू शेख हे आजूबाजूला राहतात. कालू हा गुन्हेगारीवृत्तीचा आहे. त्यांच्यात गेल्या काही दिवसापासून नाजूक मुद्यावरून वाद सुरू आहे. काही दिवसापूर्वी अनमोलच्या वाहनाचा कालूच्या श्वानाला कट लागला. त्यामुळे कालूच्या पत्नीसोबत अनमोलचा वाद झाला. तो वाढल्याने अनमोलने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. यामुळे आरोपी कालू्च्या मनात खुन्नास होती. त्याने रविवारी रात्री आपल्या साथीदारांना घरी बोलवून घेतले. अनमोल दिसताच माझ्या श्वानाला का मारले आणि माझ्या पत्नीच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार का केली, असे प्रश्न करून कालूने वाद वाढवला. त्यानंतर कालू, त्याची पत्नी तसेच साथीदार रज्जाक शेख, छोट्या सहारे, पिंटू सहारे आणि इतर साथीदारांनी लोखंडी रॉडने अनमोलवर हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून त्याचे वृद्ध वडील यादवराव चाैधरी मदतीला धावले असता त्यांनाही आरोपींनी बेदम मारहाण केली. आरडाओरड ऐकून शेजारी धावले. त्यांनी आरोपींना बाजूला केले. अनमोलने नंतर जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी विविध कलमानुसार कालू आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

---