शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

अटलजी सुशासनाचेच प्रतीक

By admin | Updated: December 26, 2014 00:48 IST

विकास आणि सुशासन यात फरक आहे. विकासाचा देखावा निर्माण केला जाऊ शकतो पण त्याचा उपयोग सामान्य माणसांना व्हावा म्हणून योग्य प्रशासन असले पाहिजे. योग्य नियोजन नसले

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी चरित्रग्रंथाचे प्रकाशन नागपूर : विकास आणि सुशासन यात फरक आहे. विकासाचा देखावा निर्माण केला जाऊ शकतो पण त्याचा उपयोग सामान्य माणसांना व्हावा म्हणून योग्य प्रशासन असले पाहिजे. योग्य नियोजन नसले तर केवळ विकासाचा उपयोग होत नाही. अटलजींनी विकासाचा मंत्र दिला पण विकासाचा उपयोग सामान्य नागरिकांना व्हावा म्हणून योग्य सुशासन असणे महत्त्वाचे आहे, असे त्यांचे मत आहे. त्यांच्या या विचारधारेवरच आमचे काम सुरू आहे. अटलजी हे सुशासनाचेच सुयोग्य प्रतीक आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी व्यक्त केले. भाजपतर्फे डॉ. नारायण खेकाळे लिखित आणि लाखे प्रकाशनाद्वारे प्रकाशित अटलबिहारी वाजपेयी यांच्या चरित्रग्रंथाचे लोकार्पण डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर प्रवीण दटके, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, प्रदेश प्रवक्ता गिरीश व्यास, आ. कृष्णा खोपडे, डॉ. राजीव पोतदार, लेखक डॉ. नारायण आणि सुजाता खेकाळे, आ. आशिष देशमुख, माजी खा. बनवारीलाल पुरोहित, बळवंतराव ढोबळे, आ. समीर मेघे, आ. मितेश भांगडिया, कल्पना पांडे, आ. सुधाकर कोहळे, अशोक मानकर, चंद्रकांत लाखे, प्रमोद पेंडके, संजय भेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, अटलजींसोबतचा प्रत्येक क्षण प्रसन्नतेचा अनुभव देणारा आहे. जनसंघाचे लोक निवडून येत नव्हते आणि अनामत रक्कम जप्त होत होती त्या काळात अटलजींनी केलेल्याा कामामुळेच आज चांगले दिवस आले आहेत. त्यांचे प्रत्येक कार्य राष्ट्राला समर्पित होते. भारतरत्न उपाधीने त्यांचा सन्मान झाला. त्यांच्या विचारधारेवर विकास आणि सुशासन आणण्याचा प्रयत्न आपण सारेच करू या, असे प्रतिपादन त्यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अटलजींचे व्यक्तिमत्व उत्तुंग होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक कंगोरे उलगडणे एका पुस्तकात शक्य नाही. पंतप्रधान असताना त्यांनी राबविलेल्या संकल्पनांचा जगात सन्मान झाला. त्यांनी केलेल्या आर्थिक आणि पायाभूत सुविधांनाही जगभर मान्यता मिळाली. पंतप्रधान सडक योजनेमुळे ३ लाख गावे जोडली गेली. त्यांच्यात सर्वसमावेशकता होती. त्यांच्या या पुस्तकाने नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असे ते म्हणाले. याप्रसंगी लेखकाचे मनोगत त्यांची मुलगी डॉ. अपर्णा गाडे यांनी वाचून दाखविले. कार्यक्रमाचे आभार राजीव पोतदार यांनी मानले. याप्रसंगी विनोद वखरे यांनी पं. बच्छराज व्यास यांचे गीत सादर केले. प्रास्ताविकातून अटलजींच्या कार्यावर गिरीश व्यास यांनी प्रकाश टाकला. (प्रतिनिधी)