शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
5
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
6
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
7
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
8
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
9
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
10
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
11
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
12
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
13
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
14
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
15
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
16
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
17
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
18
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
19
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
20
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?

सहायक पोलीस निरीक्षक गजाआड

By admin | Updated: December 11, 2014 00:51 IST

कोठडीत टाकण्याची धमकी देणाऱ्या हुडकेश्वरच्या सहायक पोलीस निरीक्षकाला (एपीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने आज पाच हजारांची लाच घेताना पकडले.

पाच हजारांची लाच घेतली : एसीबीने बांधल्या मुसक्या नागपूर : कोठडीत टाकण्याची धमकी देणाऱ्या हुडकेश्वरच्या सहायक पोलीस निरीक्षकाला (एपीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने आज पाच हजारांची लाच घेताना पकडले.विशाल प्रभूलाल जयस्वाल (वय ३७) असे आरोपी एपीआयचे नाव आहे. तो गेल्या दोन वर्षांपासून हुडकेश्वर ठाण्यात कार्यरत आहे. ६ डिसेंबरला महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेती तस्करी करणाऱ्या ट्रकचालकांना हुडकेश्वर ठाण्याच्या हद्दीत पकडले होते. महसूल अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी ट्रकचालकांसोबतच ट्रक मालकांवरही गुन्हे दाखल केले. त्याची चौकशी एपीआय जयस्वालकडे होती. जयस्वालने सुनील तांडेकर या ट्रकमालकासोबत संपर्क साधला. पाच हजार रुपये लाच दिली तर कोठडीत बंद करणार नाही. कागदोपत्री अटक करून लगेच कोर्टात हजर करू. लाच दिली नाही तर, अटक करून रात्रभर पोलीस कोठडीत ठेवीन आणि दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर करून पीसीआर घेईल, अशी धमकी जयस्वालने दिली. तांडेकर यांना एसीबीचे अधीक्षक प्रकाश जाधव यांच्याकडे मंगळवारी सायंकाळी तशी तक्रार नोंदवली. जाधव यांनी शहानिशा केल्यानंतर आज सकाळी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम घेऊन तांडेकर पोलीस ठाण्यात पोहचले. ती स्वीकारताच एसीबीच्या पथकाने एपीआय जयस्वालला जेरबंद केले. पोलीस ठाण्यात सहायक निरीक्षक लाच घेताना पकडला गेल्याच्या वृत्तामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली. (प्रतिनिधी)इतरांकडूनही वसुलीजयस्वालने अशाच प्रकारे अन्य ट्रकचालक-मालकांकडूनही मोठी रक्कम उकळल्याची चर्चा आहे. त्यांनी कारवाईच्या धाकाने तक्रार नोंदवली नाही. मात्र, तांडेकर यांनी हिंमत दाखवली. तांडेकर यांना जयस्वालने १५ हजार रुपये मागितले होते. घासाघिस केल्यानंतर ५ हजारांच्या लाचेवर सौदा पक्का झाला. हुडकेश्वर पोलीस ठाण्यातील लाचखोरीची उघडकीस आलेली वर्षभरातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी जाकीर कनोजे नामक शिपायाला एसीबीच्या पथकाने पकडले होते.घरझडतीत रोकड सापडलीलाच घेताना पकडल्यानंतर एसीबीच्या पथकाने त्याच्या नागपुरातील निवासस्थानी झडती घेतली. यावेळी घरात काही कागदपत्रे सापडली. त्यानुसार, जूनपासून आतापर्यंत एका बँकेच्या खात्यात २ लाख ५० हजार जमा केल्याचे उघड झाले. यासोबतच त्याच्याकडे १ लाख, ३० हजारांची अन्य बचत पोस्टात असल्याचे स्पष्ट झाले. जयस्वाल याचे नागपूरसोबतच पुसद, यवतमाळ येथेही निवासस्थान असल्याचे चौकशीत उघड झाले आहे.