शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

हक्काच्या मागण्यांसाठी आशावर्कर संपावर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोनाच्या संक्रमणात घराघरापर्यंत पोहणारी आणि आरोग्य व्यवस्थेचा कणा ठरलेल्या ‘आशा’ ने काम बंद आंदोलन पुकारले आहे. कारण ...

नागपूर : कोरोनाच्या संक्रमणात घराघरापर्यंत पोहणारी आणि आरोग्य व्यवस्थेचा कणा ठरलेल्या ‘आशा’ ने काम बंद आंदोलन पुकारले आहे. कारण सरकारने कोरोनाचा प्रकोप टाळण्यासाठी सार्वत्रिक लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आशांचा समावेश करण्यात आला आहे. हे आशांना मान्य नाही. सोबतच मानधनाचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे आशावर्कर व गटप्रवर्तक १५ जूनपासून संपावर गेल्या आहेत. सरकारनेही मानधन वाढीच्या बाबतीत हात वर केल्याने अशाचा संप चिघळणार आहे.

नियमानुसार १५ दिवसांची नोटीस देऊन संविधान चौकात १५ जूनपासून आशा संपावर बसल्या आहे. आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनच्या मागणी पत्रकानुसार आशांना घरोघरी जाऊन विविध प्रकारच्या तपासण्या करून सर्वे करणे, त्यांचे रेकॉर्ड ठेवणे, कोरोना लसीकरण अंतर्गत शिबिरामध्ये हजर राहणे, आदी जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त ७२ पेक्षा जास्त कामे करावी लागतात. मार्च २०२१ पासून आशांची ड्युटी प्राथमिक आरोग्य केंद्र, लसीकरण केंद्र, क्वारंटाईन सेंटर येथे सकाळी ८ पासून लावण्यात येते. आशांना २ हजार रुपये नियमित मानधन, त्याव्यतिरिक्त १ हजार रुपये केंद्र सरकारने कोरोनाच्या कामासाठी दिलेले वाढीव मानधन, १७ जुलै २०२० च्या शासकीय आदेशानुसार आशाच्या मोबदल्यात २००० रुपये वाढ करण्यात आली. पण ही वाढ बहुतांश जिल्ह्यात मिळालेली नाही. फेब्रुवारी २०२१ नंतर १ हजार रुपयांची वाढ सुद्धा अनेक आशांना मिळालेली नाही. २००० रुपयांच्या मानधनातही बैठक भत्ता, लसीकरण भत्ता दिला जातो. पण ते काम न केल्यास त्यातही कपात केली जाते. कोरोनाच्या काळात सरकारने आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ केली. पण आशांनी आपल्याला वाढीव मानधन मिळावे म्हणून मंत्र्यांकडे मागणी केली असता, निधीच नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आशांचा संताप आणखी वाढला आहे.

- अत्यल्प मोबदल्यात, सुरक्षेची कुठलीही साधने नसताना आम्ही काम करतोय. कोरोनाच्या काळात सर्व घरात असताना आम्ही रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेत होतो. कामाचा मोबदला काय तर ३५ रुपये दिवसाला. आमच्या कामाची दखलच नसेल तर पर्याय नाही.

रंजना पौनीकर, आशावर्कर

- सोमवारी आशांचा मोर्चा जिल्हा परिषदेवर निघणार आहे. मंगळवारी भिक मागो आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध करणार आहे. किमान वेतन मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे.

राजेंद्र साठे, अध्यक्ष, आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन