शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना संक्रमणाचा चढता आलेख कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी/हिंगणा/कळमेश्वर/सावनेर/रामटेक/काटाेल/माैदा/नरखेड : नागपूर जिल्ह्यातील काेराेना संक्रमणाचा चढता आलेख रविवारी (दि. २८) देखील कायम राहिला. रविवारी नागपूर ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी/हिंगणा/कळमेश्वर/सावनेर/रामटेक/काटाेल/माैदा/नरखेड : नागपूर जिल्ह्यातील काेराेना संक्रमणाचा चढता आलेख रविवारी (दि. २८) देखील कायम राहिला. रविवारी नागपूर शहरासह ग्रामीण भागात एकूण ३,९७० काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांची नाेंद करण्यात आली असून, यातील ५८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १५८ रुग्ण कामठी तालुक्यात आढळून आले असून, हिंगणा तालुक्यात १००, कळमेश्वर तालुक्यात ७०, रामटेक तालुक्यात ५५, काटाेल तालुक्यात ५४, कामठी तालुक्यात ५१, त्याखालाेखाल सावनेर तालुक्यात तर माैदा तालुक्यात ३२ आणि नरखेड तालुक्यात सात नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली आहे.

कामठी तालुक्यात रविवारी १५८ रुग्ण आढळून आले आहेत. यात कामठी शहर व तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात सर्वाधिक रुग्ण महादुला व त्याखालाेखाल काेराडी येथे आढळून आहेत. हिंगणा तालुक्यात काेराेनाच्या १०० नवीन रुग्णांची भर पडली आहे. या नवीन रुग्णांमध्ये वानाडोंगरी शहरातील ४७, हिंगणा शहरातील १०, इसासनी येथील आठ, रायपूर व डिगडोह येथील प्रत्येकी सहा, नीलडोह येथील पाच, वडगाव (गुजर), मांडव-घोराड व सावंगी-देवळी येथील प्रत्येकी दाेन, देवळी-आमगाव, गोंडवाना, खापरी (मोरेश्वर), टाकळघाट, कोतेवाडा, गुमगाव, वागदरा (गुमगाव), देवळी-सावंगी, कान्होलीबारा, सालई (दाभा) व मेटाउमरी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहेे. या १०० रुग्णांमुळे तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ‌५,६५० झाली असून, यातील ४,७०९ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. शिवाय, ११९ रुग्णांचा आजवर उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कळमेश्वर तालुक्यातही रविवारी ७० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यात कळमेश्वर-ब्राह्मणी शहरातील १८ तर ग्रामीण भागातील ५२ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील ५२ रुग्णांमध्ये घोराड येथील पाच, उबाळी, मांडवी, म्हसेपठार, कोहळी, सुसंद्री, तेलगाव, तेलकामठी, तिष्टी (बु.) येथील प्रत्येकी चार, मोहपा शहरातील तीन, पानउबाळी व सवंद्री येथील प्रत्येकी दाेन तसेच वाढोणा, पिपळा, तोंडाखैरी, सोनेगाव, तिडंगी, नांदिखेडा, जुनेवानी व सोनोली येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.