शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

अरुण गवळीची सुटका लांबणीवर

By admin | Updated: May 3, 2015 02:05 IST

विभागीय आयुक्तांचा आदेश नागपूर मध्यवर्ती कारागृहात उशिरा पोहोचल्याने मुंबईचा डॉन आणि एका खुनातील जन्मठेपी अरुण ऊर्फ डॅडी गुलाब गवळी .....

नागपूर : विभागीय आयुक्तांचा आदेश नागपूर मध्यवर्ती कारागृहात उशिरा पोहोचल्याने मुंबईचा डॉन आणि एका खुनातील जन्मठेपी अरुण ऊर्फ डॅडी गुलाब गवळी याची शनिवारी होणारी पॅरोलवरील सुटका लांबणीवर पडली आहे. पुढचे दोन दिवस सरकारी सुटीचे असल्याने तो मंगळवारी कारागृहाच्या बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अरुण गवळीचा मुलगा महेश याचे लग्न ९ मे रोजी मुंबई येथे होणार आहे. लग्नात हजर राहण्यासाठी त्याने नागपूरचे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्याकडे पॅरोल रजा मिळण्यासाठी अर्ज केला होता. तो फेटाळण्यात आला होता. त्यामुळे त्याने विभागीय आयुक्ताच्या आदेशाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. २७ एप्रिल रोजी ही याचिका मंजूर होऊन उच्च न्यायालयाने गवळीला पॅरोलवर सोडण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गवळीच्या कुटुंबाकडून पॅरोलवर सुटका होण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. शनिवारी सायंकाळपर्यंत त्याच्या सुटकेची दाट शक्यताही होती. सायंकाळच्याच विमानाने तो मुंबईकडे रवानाही होणार होता. त्यासाठी संपूर्ण तयारीही झाली होती. त्याला घेण्यासाठी त्याचे समर्थक मोठ्या प्रमाणावर कारागृहासमोरही जमले होते. परंतु विभागीय आयुक्तांचा त्याला सोडण्याबाबतचा आदेश कारागृहात उशिरा पोहोचला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विभागीय आयुक्त अनुप कुमार हे वर्धा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमासाठी गेले होते. ते उशिरा कार्यालयात परत आले. लागलीच त्यांनी आदेशावर सही केली. त्यानंतर हा आदेश कारागृहाकडे रवाना झाला. परंतु आदेश पोहोचण्यास बराच विलंब झाला होता. गवळी कारागृहाबाहेर पडणार नसल्याची खात्री झाल्याने त्याचे समर्थक निराश होऊन परत गेले. गवळी बाहेर पडण्याच्या शक्यतेने कारागृहासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.(प्रतिनिधी)