शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

मायलेकावर सशस्त्र हल्ला

By admin | Updated: September 10, 2016 02:45 IST

जुन्या वादातून चौघांनी दोन भावंडावर सशस्त्र हल्ला चढवला. मुलांना मारहाण होत असल्याचे पाहून मध्ये धावलेल्या आईलाही आरोपींनी जबर मारहाण केली.

नागपूर : जुन्या वादातून चौघांनी दोन भावंडावर सशस्त्र हल्ला चढवला. मुलांना मारहाण होत असल्याचे पाहून मध्ये धावलेल्या आईलाही आरोपींनी जबर मारहाण केली. यात आई आणि तिची दोन मुले जबर जखमी झाली. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमीचे एका महिलेसोबत असलेल्या मैत्रिपूर्ण संबंधामुळे यशोधरानगरात गुरुवारी रात्री ही घटना घडल्याचे सांगितले जाते. राजेश दशरथ सातपुते (वय २२) हा यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संतोषनगरात राहतो. त्याचे एका महिलेशी मैत्रिपूर्ण संबंध असल्यामुळे एका आरोपीसोबत राजेश आणि त्याचा भाऊ नितीन याचा वाद होता. या पार्श्वभूमीवर, आरोपी बबलू शिवकुमार जुटेलकर (वय ३०), मुन्ना सवकीलाल गोंडाणे (वय ३२), उमेश गोंडाणे (वय ३०) आणि अश्विन महतो (वय २२) यांनी गुरुवारी रात्री ११.२० वाजता आरोपी राजेशवर हल्ला चढवला. त्यांनी भाल्याचे पाते आणि लाठ्यांनी राजेशला मारून गंभीर जखमी केले. राजेशच्या मदतीला धावलेल्या नितीनलाही आरोपींनी बेदम मारहाण केली. मुलांना होत असलेली मारहाण पाहून राजेशची आई मदतीसाठी धावली असता आरोपींनी तिलाही मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. राजेशच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांची चौकशी केली जात आहे. (प्रतिनिधी)