शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोरिक्षा परवानासाठी शिक्षणाची अट रद्द

By admin | Updated: October 30, 2015 02:57 IST

राज्याच्या विविध शहरांमधील सुमारे दीड लाख आॅटोरिक्षांचे परवाने अनेक कारणास्तव परिवहन विभागाने रद्द केले होते.

परिवहन विभागाचे आदेश : नूतनीकरणासाठी १६ नोव्हेंबरपर्यंत संधीनागपूर : राज्याच्या विविध शहरांमधील सुमारे दीड लाख आॅटोरिक्षांचे परवाने अनेक कारणास्तव परिवहन विभागाने रद्द केले होते. या परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु याला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने यातील आठवी पास शिक्षणाची अट रद्द केली आहे. याचा फायदा नागपूर शहर व ग्रामीण भागातील दोन हजारावर आॅटोरिक्षा परवानाधारकांना होण्याची शक्यता आहे. राज्यात सद्य:स्थितीत ७ लाख २६ हजार आहेत. यातील १ लाख ४० हजार ६५ आॅटोरिक्षांचे परवाने परिवहन विभागाने रद्द केले आहेत. त्यांच्या नूतनीकरणाचा आग्रह आॅटोरिक्षा चालक संघटनांनी धरला होता. अखेर परिवहन विभागाने आपले जुने आदेश मागे घेत परवान्यांचे नूतनीकरण करण्याचे नवे आदेश काढले. परवाना नूतनीकरणाची शेवटची मुदत ३१ आॅक्टोबर देण्यात आली होती, परंतु आता ती वाढवून १६ नोव्हेंबर २०१५ करण्यात आली आहे. परिवहन आयुक्तांच्या नव्या आदेशानुसार या तारखेपर्यंत परवानाधारकांनी परवाना नूतनीकरण केले नाही तर त्यांचे परवाने कायमचे रद्द होणार आहेत. ही कारवाई २३ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. याशिवाय परवाने नूतनीकरण न करता वापरल्या जाणाऱ्या तसेच परवानाशिवाय अवैधपणे प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या आॅटोरिक्षांची तपासणी मोहिम हाती घेण्याचेही आदेश देण्यात आले आहे. या मोहिमेवर लक्ष ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे.नागपूर विभागाची जबाबदारी अपर परिवहन आयुक्त सतीश सहस्त्रबुद्धे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)