शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

प्रशंसनीय तत्परता

By admin | Updated: May 7, 2016 03:02 IST

अपघात झाल्यानंतर मदतीला धावल्यास पोलिसांचे लचांड मागे लागेल, असे समजून अपघातग्रस्तांना मदत करण्याचे टाळले जाते.

दोन मिनिटात पोलीस : सात मिनिटात अ‍ॅम्बुलन्स नागपूर : अपघात झाल्यानंतर मदतीला धावल्यास पोलिसांचे लचांड मागे लागेल, असे समजून अपघातग्रस्तांना मदत करण्याचे टाळले जाते. त्यामुळे बराच वेळ जखमी तडफडत राहतो. माहिती कळल्यानंतरही पोलीस विलंबाने पोहचतात. हा नेहमीचाच अनुभव आहे. मात्र, आज एक सुखद अनुभव आला. अपघातानंतर अवघ्या दोन मिनिटात पोलीस पोहचले अन् सात मिनिटात अ‍ॅम्बुलन्स आली. जखमीला तातडीने मदत मिळाली. हो, ही सुखद घटना आणि प्रशंसनीय तत्परता शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास व्हीएनआयटी गेटसमोर अनेकांनी अनुभवली. एका बेदरकार मोटरसायकलचालकाने आधी कारला आणि नंतर एका सायकलस्वाराला धडक मारली. सायकलस्वार रस्त्यावर पडून बेशुद्ध झाला. वर्दळीचा मार्ग त्यामुळे मोठी गर्दी जमली. परंतु, बघे नुसतेच बघत होते. काही तरुणांनी दोषी मोटरसायकलचालकाला घेरले अन् त्याच्यावर राग काढू लागले. काहींनी मारहाणही केली. या गर्दीतील प्रणव नामक विद्यार्थ्याने मात्र लगेच फोन काढला. १०८ क्रमांकावर फोन करून अपघाताची माहिती दिली. घटनास्थळ समजावून सांगितले. नंतर १०० क्रमांकावर फोन करून पोलिसांनाही कळविले. विशेष असे की दोनच मिनिटात पोलीस पोहचले. अन् अवघ्या सात मिनिटात अ‍ॅम्बुलन्स आली. जखमी व्यक्तीला तातडीने वैद्यकीय मदत मिळाली. उपराजधानीच्या रस्त्यावर आज ही प्रशंसनीय तत्परता बघायला मिळाली. फोन करणाऱ्या प्रणवसोबतच पोलीस अन् अ‍ॅम्बुलन्स चालकाचेही अनेकजण बराचवेळ तोंडभरून कौतुक करीत होते. (प्रतिनिधी)अ‍ॅम्बुलन्सची लिंकअ‍ॅम्बुलन्सला फोन करताच प्रणव यांच्या मोबाईलवर एक लिंक आली. या लिंकमध्ये गुगल मॅपच्या आधारे घटनास्थळाकडे येणारी अ‍ॅम्बुलन्स सध्या कुठे आहे व कोणत्या मार्गाने येत आहे याची माहिती मिळाली. नाव सांगण्याची गरज नाहीघटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी प्रणवला अजिबात त्रास दिला नाही. सर्व आटोपल्यावर प्रणवने बीट मार्शल नरेंद्र यांना विचारले की मला थांबायचे आहे का, काही अधिकची माहिती हवी आहे का ? मात्र, कुठल्याही माहितीची गरज नाही, असे नरेंद्र यांनी सांगितले. एवढ्यात प्रणव यांना एक फोन आला व अ‍ॅम्बुलन्स पोहचली का याची विचारणा केली. भविष्यात अशी घटना घडली तर पुन्हा फोन करा, असे आवाहनही प्रणवला करण्यात आले.