शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

सासरा व दीराचा जामीन अर्ज फेटाळला

By admin | Updated: September 14, 2016 03:19 IST

कळमेश्वर येथे एका विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्या न्यायालयाने

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे प्रकरण : लैंगिक छळ झाला होता असह्यनागपूर : कळमेश्वर येथे एका विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्या न्यायालयाने आरोपी सासरा आणि दीराचा जामीन अर्ज फेटाळून लावला. दशरथ गोविंदराव मोहाडे आणि संजय दशरथ मोहाडे, अशी आरोपींची नावे आहेत. स्वाती अरविंद मोहाडे, असे मृत महिलेचे नाव होते. मृत महिलेचे वडील रमेश थोराणे यांच्या तक्रारीवरून कळमेश्वर पोलिसांनी भादंविच्या ३०६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करून ३ आणि ४ आॅगस्ट २०१६ रोजी दोन्ही आरोपींना अटक केली होती. तक्रारकर्त्यानुसार स्वातीचे लग्न २८ एप्रिल २०१५ रोजी अरविंद दशरथ मोहाडे याच्यासोबत झाले होते. लग्नानंतर अरविंद आणि स्वाती हे दोघे नागपुरात फुटाळा तलावनजीक राहत होते. अरविंद मोहाडे याचे गुरु अन्नू बाबा ऊर्फ शेख अन्वर नक्शबंदी याने थोराणे यांची भेट घेऊन स्वातीवर सासरा आणि दीराने बलात्कार केल्याचे त्यामुळे तिची प्रकृती बिघडल्याचे सांगितले होते. लागलीच स्वातीची तिच्या आईने भेट घेतली होती. तिने आईजवळ संपूर्ण कर्मकहाणी सांगितली होती. रमेश थोराणे यांनी फेब्रुवारीमध्ये आपले जावई अरविंदची भेट घेतली होती. अरविंदने त्यांना दशरथ आणि संजयने स्वातीवर बलात्कार केल्याने तिच्यासोबत संसार करण्यास नकार दिला होता. स्वातीपासून आपणास घटस्फोट पाहिजे, असेही तो म्हणाला होता. सासऱ्याने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्याच्यावर कोणताही परिणाम होत नव्हता. अरविंदने त्यांना वकिलाकडेही नेले होते. त्यानंतर अरविंद हा एकटाच नागपुरात परतला होता तर स्वाती आपल्या आईसोबत थांबली होती. फिर्यादी वडिलाच्या माहितीनुसार आरोपी हे स्वातीचा वारंवार नैसर्गिक आणि अनैसर्गिक लैंगिक छळ करायचे, कुणाला सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी द्यायचे, वैफल्यग्रस्त होऊन तिने ३० जुलै २०१६ रोजी विषप्राशन केले होते. तब्बल आठ तास मृत्यूशी झुंज देत तिचा मृत्यू झाला होता. दोन्ही आरोपींनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल करताच प्रकरण गंभीर असल्याने न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावले. (प्रतिनिधी)