शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘रिफंड’साठी रेल्वे प्रवाशांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:08 IST

नागपूर : कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्यामुळे अनेक प्रवासी आपले तिकीट रद्द करीत आहेत. परंतु तिकिटाची रक्कम परत घेण्यासाठी ...

नागपूर : कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्यामुळे अनेक प्रवासी आपले तिकीट रद्द करीत आहेत. परंतु तिकिटाची रक्कम परत घेण्यासाठी (रिफंड) त्यांना मनस्ताप होत आहे. रेल्वेजवळ पैसे उपलब्ध नसल्याचे सांगून त्यांना दुसऱ्या रेल्वेस्थानकावर पाठविण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात असल्याची स्थिती आहे.

इतवारी रेल्वेस्थानकावर गुरुवारी प्रवाशाला पैसे उपलब्ध नसल्याचे सांगून नागपूर रेल्वेस्थानकावर जाण्यास सांगण्यात आले. नागपूर रेल्वेस्थानकावरही पैसे मिळत नव्हते. अर्ध्या तासानंतर दुसऱ्या काऊंटरवरून त्यांना पैसे देण्यात आले. मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांनी आरक्षण करणे सुरू केले. परंतु अचानक पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रवासी आपली तिकिटे रद्द करीत आहेत. परंतु पैशासाठी त्यांना एका रेल्वेस्थानकावरून दुसऱ्या रेल्वेस्थानकावर पाठविण्यात येत असल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जाऊन त्यांना मनस्ताप होत आहे. तिकिटाची रक्कम देण्यासाठी प्रवाशांना परत पाठविणे चुकीचे आहे. प्रवासी ज्या रेल्वेस्थानकावर गेला तेथे तिकिटाची रक्कम परत देण्याची गरज असल्याचे मत भारतीय यात्री केंद्राचे अध्यक्ष बसंत कुमार शुक्ला यांनी व्यक्त केले.

............

प्रवाशाने सांगितली आपबिती

इतवारीत राहणारे राकेश चड्डा यांनी सांगितले की, त्यांनी २७ मार्चला नागपूर-अमृतसर जाणारी रेल्वेगाडी क्रमांक ०२०२५ या गाडीचे तिकीट काढले होते. त्याची किंमत १२ हजार रुपये झाली. परंतु कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे त्यांनी प्रवास रद्द करण्याचा निर्णय घेतला. इतवारीला तिकीट रद्द करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना एक तास थांबवून पैसे नसल्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर जाण्याचा सल्ला देण्यात आला. नागपूर रेल्वेस्थानकावरही अर्धा तास वाट पाहिल्यानंतर त्यांना तिकिटाची रक्कम देण्यात आली.

................