शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांच्या निष्क्रियतेवर नाराजी

By admin | Updated: July 12, 2016 02:59 IST

महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. मात्र, लोकसभा व विधानसभा लढलेले नागपुरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कार्यकर्त्यांच्या या

वडेट्टीवारांच्या घरी प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक निवडणुका तोंडावर, नेते घराबाहेर पडेनातकमलेश वानखेडे ल्ल नागपूरमहापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. मात्र, लोकसभा व विधानसभा लढलेले नागपुरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कार्यकर्त्यांच्या या निवडणुकीसाठी पुढाकार घेताना दिसत नाहीत. त्यामुळे आता आपल्यालाच काहीतरी करावे लागेल, असा निरोप देत प्रदेश काँग्रेसच्या नागपुरातील पदाधिकाऱ्यांची रविवारी गुप्त बैठक झाली. नागपूरचे पालक पदाधिकारी असलेले आ. विजय वडेट्टीवार यांनी या बैठकीचे नेतृत्व केले. बैठकीत, ज्येष्ठ नेते हे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी कुठलेही नियोजन आखताना दिसत नाही. वरिष्ठ नेत्यांकडून अजिबात सहकार्य मिळत नाही. त्यामुळे आता दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना समोर करून काँग्रेसने मैदानात उतरावे, अशा शब्दात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची संमती घेऊनच ही बैठक घेण्यात आल्याची माहिती आहे. आ. वडेट्टीवार यांच्या घरी रविवारी दुपारी झालेल्या या बैठकीत नागपूर शहर जिल्हा काँग्रेसचे प्रभारी व प्रदेश महासचिव झिया पटेल, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, विनोद जैन यांच्यासह प्रदेश सरचिटणीस डॉ. बबनराव तायवाडे, प्रफुल्ल गुडधे, अभिजित सपकाळ, रामकिशन ओझा, सचिव अतुल कोटेचा, नितीन कुंभलकर, उमाकांत अग्निहोत्री, मुजीब पठाण उपस्थित होेते. प्रदेश पदाधिकाऱ्यांशिवाय कुणालाही बैठकीचे निरोप देण्यात आले नव्हते.शहर कार्यकारिणी त्वरित जाहीर व्हावी४शहर अध्यक्ष विकास ठाकरे शहरातील विविध प्रश्न घेऊन लढा देत आहेत. मात्र, त्यांना पक्षातर्फे पाठबळ मिळण्यासाठी शहर कार्यकारिणी त्वरित जाहीर होणे आवश्यक आहे. पद मिळाले तर कार्यकर्त्यांना अधिकार मिळतील व त्यांचा काम करण्याचा उत्साह वाढेल. त्यामुळे शहर कार्यकारिणीला त्वरित मंंजुरी द्यावी, अशी विनंती प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याकडे करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.