शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
3
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
4
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
5
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
6
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
7
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
8
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
9
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
10
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
11
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
12
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
13
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
14
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
15
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
16
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
17
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
18
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
19
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
20
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका

पाच हजार भरा तरच अ‍ॅन्जिओेग्राफी

By admin | Updated: June 12, 2017 02:15 IST

तुम्ही दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) असाल तरीही ‘अ‍ॅन्जिओग्राफी’साठी पाच हजार रुपये भरणे आवश्यक आहे.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : जीवनदायीच्या लाभार्थ्यांकडूनच पैशांची मागणीसुमेध वाघमारे। लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तुम्ही दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) असाल तरीही ‘अ‍ॅन्जिओग्राफी’साठी पाच हजार रुपये भरणे आवश्यक आहे. त्या शिवाय ही तपासणीच होत नाही. शासकीय रुग्णालयांमध्ये ‘बीपीएल’च्या रुग्णांवर नि:शुल्क उपचार करण्याचे शासनाचे आदेश असताना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसह खासगी इस्पितळांमध्ये गरीब रुग्णांकडून हा पैसे उकळण्याचा गोरखधंदा सर्रास सुरू आहे. परिणामी, पैशांअभावी रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. हृदयाचा आजार आता श्रीमंतांचा राहिलेला नाही. तो सामान्य कामगार, गरिबांच्या घरातही दिसू लागला आहे. या आजाराच्या रुग्णाला इस्पितळात दाखल करण्याची वेळ आली तर मोठे संकट कोसळल्याप्रमाणे त्या घराची स्थिती होते आणि प्रत्यक्ष आजारापेक्षादेखील त्यावरचा उपचाराच जास्त मोठे संकट असल्यासारखे वाटते. खासगी इस्पितळातील लूट आणि शासकीय इस्पितळात नेल्यास पैशासोबतच रु ग्ण जीवानिशी जाण्याची भीती या कात्रीत सापडला आहे. विशेष म्हणजे, गोरगरीब रु ग्णांना दर्जेदार उपचार देण्याचे स्वप्न दाखविणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत (पूर्वीची ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’) या चाचणीचा समावेश आहे. तरीही या योजनेतील सर्व खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये लाभार्थ्यांना पैसे मोजावे लागत आहे. शुल्क भरण्याची जाचक अटसुत्रानूसार, पूर्वी जीवनदायी आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांकडून अ‍ॅन्जिओग्राफीसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शुल्क आकारले जात नव्हते, परंतु काही खासगी इस्पितळे याचा फायदा घेऊ लागल्याने ‘सुपर’ने पाच हजार रुपये शुल्क आकारणे सुरू केले. याला पाहून योजनेतील खासगी इस्पितळांनीही हे शुल्क आकारणे सुरू केले. याचा फटका मात्र गरीब रुग्णांना बसत आहे. लाभार्थी असूनही ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनी ही चाचणी करावीच नाही का, असा प्रश्न विचारल्या जात आहे.खासगीमध्ये पैसेही परत मिळत नाहीया योजनेच्या लाभार्थ्याने शुल्क भरुन अ‍ॅन्जिओग्राफी केल्यानंतर त्यात दोष आढळून आल्यास आणि नंतर अ‍ॅन्जिओप्लास्टी केल्यास त्या रुग्णाला हे पाच हजार रुपये परत मिळतात. मात्र, अ‍ॅन्जिओग्राफीमध्ये दोष आढळून न आल्यास पैसे मिळत नाही. हे पैसे संबंधित रुग्णालयाच्या खात्यात जमा होतात. असा अजब कारभार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसह योजनतील सर्वच खासगी इस्पितळांमध्ये बिनबोभाट सुरू आहे.लाभार्थ्यांकडून पैसे घेणे गंभीर बाबजीवनदायी आरोग्य योजनेत समावेश असलेल्या उपचारासाठी लाभार्थ्यांकडून पैसे उकळले जात असेल तर, ही गंभीर बाब आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ‘बीपीएल’रुग्णाकडून अ‍ॅन्जिओग्राफीचे शुल्क आकारण्याची तक्रार प्राप्त झाल्यास त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल. हा प्रकार थांबायला हवा.-गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षण मंत्री