शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

देवदूत भेटला अन् वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला!

By admin | Updated: November 2, 2015 02:22 IST

दोनवेळच्या पोटासाठी मायबापांचा आयुष्यभर सुरू असलेला संघर्ष. त्यातच आई जग सोडून गेली.

दोन महिन्यापासून घरापासून दुरावलेल्या मुलाची घडविली भेट नागपूर : दोनवेळच्या पोटासाठी मायबापांचा आयुष्यभर सुरू असलेला संघर्ष. त्यातच आई जग सोडून गेली. आईविना पोरक्या झाल्यामुळे आईच्या आठवणींनी तो अस्वस्थ होता. शाळेत मन लागत नव्हते. एका दिवशी गुरुजींनी रागविले, त्यातच आईची आठवण त्याला अस्वस्थ करीत होती. दोन महिन्यापूर्वी तो अचानक बेपत्ता झाला. घरात चिंतेचे वातावरण पसरले, शोधाशोध सुरू झाली. गुरुवारी हिमांशूच्या रुपाने देवदूत भेटला. घरापासून दूरावलेल्या या मुलाची हिमांशूने घरच्यांशी भेट घडवून दिली. विकास कांताराम घुगल असे या मुलाचे नाव असून, तो सावनेर तालुक्यातील जैतपूर या गावाचा रहिवासी आहे. १५ वर्षीय विकासच्या आईचा तीन वर्षापूर्वी मृत्यू झाला. घरी वडील मजुरी करायचे. मोठा भाऊ एका गॅरेजमध्ये काम करीत होता. आईच्या मृत्यूनंतर विकास अस्वस्थ झाला होता. शाळेतही त्याचे मन लागत नव्हते. घरची परिस्थितीही नाजूक असल्याने, कुणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. दोन महिन्यापूर्वी तो कुणालाही न सांगता घराबाहेर पडला. भटकत नागपुरात पोहचला. वर्धा रोडवरील एका धाब्याच्या मालकाने त्याला कामावर ठेवले. मात्र घरच्यांची चिंता वाढली, शोधाशोध सुरू झाली. पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली. परंतु तो सापडला नाही, शेवटी घरच्यांनीही अपेक्षा सोडली. शाहू नगर येथील रहिवासी सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेला हिमांशू ठवकर गुरुवारी ढाब्यावर जेवायला गेला. तेव्हा विकास त्याच्यासमोर रडू लागला. घरच्यांना भेटण्यासाठी आग्रह करू लागला. हिमांशूने ढाब्याच्या मालकाला विनंती करून विकासला घरी आणले. त्याला रात्रभर घरी ठेवले. त्याच्या घरच्यांची विचारणा केली. सावनेर डेपोचा दूरध्वनी क्रमांक मिळविला. तिथे पांडे नावाच्या व्यक्तीशी त्याने संपर्क साधला. डेपोच्या जवळच विकासचा भाऊ आकाश हा गॅरेजमध्ये काम करायचा. पांडे यांनी आकाशला माहिती देऊन हिमांशूशी संपर्क साधायला लावला. दोघांचे बोलणे झाल्यानंतर, हिमांशूने त्याला घरी बोलावून, विकासला त्यांच्या सुपूर्द केले. (प्रतिनिधी)एक चांगले काम हातून घडल्याचे समाधानघरच्यांच्या भेटीसाठी विकास रडत असताना बघून मी अस्वस्थ झालो. तेव्हाच त्याच्या घरच्यांशी भेट घडवून देण्याचा निर्णय घेतला. आईला सांगून मी त्याला घरी आणले. सुदैवाने त्याच्या घरच्यांशीही सहज संपर्क झाला. माझ्या माध्यमातून विकासला घर मिळाल्याचे मला समाधान आहे. मदतीची भावना प्रत्येकानेच जपावी, असे मला वाटते. हिमांशू ठवकर, सॉॅफ्टवेअर इंजिनिअर