नागपूर : १९९५ पासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना गेल्यावर्षीपर्यंत दिवाळी बोनस मिळाले, परंतु यावर्षी दिवाळी संपून दोन महिन्यांचा कालावधी होत असतानाही बोनस मिळाला नाही, या मुख्य मागणीला घेऊन इतरही मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आज विधानभवनावर हल्लाबोल केला. अंगणवाडी कर्मचारी सभेच्यावतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात राज्यभरातून अंगणवाडी कर्मचारी व सेविका सहभागी झाल्या होत्या. विशेषत: पुणे, सिंधुदूर्ग, अहमदनगर, नाशिक व कोल्हापूरमधून कर्मचारी स्वखर्चाने आल्या होत्या. दुपारी ३ नंतरही कर्मचाऱ्यांचे खासगी वाहनाने येणे सुरू होते. अनेक महिला आपल्या कुटुंबासमवेत आल्या होत्या. मोर्चाच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन महिला, बालकल्याण मंत्री विद्या ठाकूर यांना दिले. यावेळी ठाकूर यांनी मानधन कमी असल्याचे मान्य करीत ते वाढविण्याचे व तत्काळ बोनस देण्यासाठी वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिष्टमंडळाने आठ दिवसांत यावर निर्णय न झाल्यास आंदोलन उभे करू असा, इशाराही दिला.नेतृत्वअॅड. निशा शिवूरकर, कमल परुळेकर, इकलाख कुरेशी, जयश्री काळे, प्रमिला मर्दाने व कल्पना तटकरे.मागण्यादिवाळी बोनस तत्काळ मिळावा व तो मानधनाएवढा देण्यात यावा.३० एप्रिल २०१४ रोजी निवृत्ती वेतन देण्याचे आदेश निघाले. परंतु सेवानिवृत्तीनंतरही अद्याप एकाही कर्मचाऱ्याला याचा लाभ मिळाला नाही. तो तातडीने देण्यात यावा.वर्षातून १५ दिवस भरपगारी आजारपणाची रजा देण्यात यावी.उन्हाळी सुटी एक महिन्याची करावी.सेविकांची दरमहा ७५० रुपये मानधन वाढ त्वरित लागू करावी.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा हल्लाबोल
By admin | Updated: December 20, 2014 02:34 IST