शहरं
Join us  
Trending Stories
1
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
2
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
3
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
4
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
5
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
6
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
7
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
8
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
9
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
10
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
11
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
12
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
13
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
14
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
15
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
16
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
17
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
18
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
19
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
20
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर

...अन् झळकला आत्मविश्वास

By admin | Updated: August 4, 2014 00:55 IST

श्रद्धानंदपेठ येथील श्रद्धानंद अनाथालयातील मुलींमध्ये रविवारी आत्मविश्वास झळकत होता. त्यांचे डोळे सांगत होते की त्यांच्यात पण दुर्दम्य इच्छाशक्ती आहे, हावभाव सांगत होते की

श्रद्धानंद अनाथालयातील प्रदर्शन : मुलींमधील सुप्त गुणांना मिळाला वाव नागपूर : श्रद्धानंदपेठ येथील श्रद्धानंद अनाथालयातील मुलींमध्ये रविवारी आत्मविश्वास झळकत होता. त्यांचे डोळे सांगत होते की त्यांच्यात पण दुर्दम्य इच्छाशक्ती आहे, हावभाव सांगत होते की त्यांच्यातदेखील एक चांगला कलाकार दडला आहे अन् त्यांची कृती स्पष्ट करत होती की जर संधी मिळाली तर त्यादेखील आपली कला जगासमोर सुंदरपणे मांडू शकतात. रविवारी अनाथालयाच्यावतीने येथील मुलींनी स्वत:च्या हातांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनाला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद तर दिलाच, शिवाय मुलींच्या कलाकौशल्याचे भरभरून कौतुकदेखील केले.रविवारी महापौर अनिल सोले यांच्या हस्ते या एक दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. अनाथालयातील १२ ते १८ वर्ष वयोगटातील मुलींनी तयार केलेल्या निरनिराळ्या गृहोपयोगी तसेच सजावटीच्या वस्तू यात मांडण्यात आल्या होत्या. मुलींना प्रोत्साहन देणे हा आमचा सतत प्रयत्न असतो. त्यांच्यातील सुप्त गुणांना प्रकाशात आणणे या उद्देशातून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती संस्थेच्या सहसचिव गीतांजली बुटी यांनी दिली.समाजातील भावंडांसाठी राख्याअनाथालयातील मुलींनी समाजातील भावंडांसाठी तयार केलेल्या सुंदर राख्यादेखील प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. १२ ते १५ मुलींनी तयार केलेल्या या राख्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून निरनिराळ्या घरात जातील व समाजातील भावंडांच्या हातावर बांधल्या जातील याचे समाधान राहील, अशी बोलकी प्रतिक्रिया या मुलींनी व्यक्त केली. याशिवाय स्वत:च्या हाताने रेखाटलेल्या सुरेख डिझाईन्स अन् आकर्षक रंगसंगती असलेली शुभेच्छापत्रेदेखील ठेवण्यात आली होती. अनाथालयातील मुलींनी तयार केलेले लहान मुलांचे स्वेटर्स, कॅन्डलचे सुशोभित काम याचे उपस्थितांनी कौतुक केले. याशिवाय मातीचे फ्लॉवर पॉट, कागदापासून तयार केलेली शोभिवंत फुलेदेखील लक्ष वेधून घेत होती.‘इकोफ्रेंडली’ वस्तूंवर भरश्रद्धानंद अनाथालयातील या मुलींनी निरनिराळ्या वस्तू तयार करताना त्या ‘इकोफ्रेंडली’ ठेवण्यावर जास्त भर दिला. यात शुभेच्छापत्रे, टाकावू कागदापासून तयार केलेली पाकिटे, शोभिवंत पोस्टर्स, वॉलहँगिंग्ज यांचा समावेश होता.